Team India : भारताने 50 ओव्हरच्या मॅचमध्ये टॉस जिंकला, कॅप्टन रोहितचा निर्णय काय?

| Updated on: Dec 01, 2024 | 9:23 AM

Australia PM XI vs India Toss: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकला आहे. रोहितने काय निर्णय घेतला? जाणून घ्या. उभयसंघात 50-50 षटकांचा सामना होणार आहे.

Team India : भारताने 50 ओव्हरच्या मॅचमध्ये टॉस जिंकला, कॅप्टन रोहितचा निर्णय काय?
Australia PM XI vs India Toss
Image Credit source: Bcci x Account
Follow us on

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून एडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असून पिंक बॉलने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दोन्ही संघांचा सराव व्हावा यासाठी इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्यात 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 2 दिवसीय सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला. त्यामुळे आता 1 डिसेंबरला उभयसंघात 50-50 ओव्हरची मॅच होत आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 40 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीला कौल लागला. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांचं कमबॅक झालं आहे. रोहितने त्याच्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर काही वेळ कुटुंबियांसोबत घालवल्यानंतर आता परतला आहे. तर शुबमन गिल याला दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळता आलं नव्हतं. अशात आता दोघेही परतले आहेत. त्यामुळे आता शुबमन दुसऱ्या कसोटीतही खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे. शुबमनला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीलाही मुकावं लागणार असल्याची चर्चा होती.

बॉलर्ससाठी नो लिमिट

दरम्यान या सराव सामन्यात गोलंदाजांसाठी षटकांची काहीही मर्यादा नाही. कोणताही बॉलर कितीही ओव्हर टाकू शकतो. त्यामुळे दोन्ही संघांच्या गोलंदाजांना सरावाची चांगली संधी आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकला

ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर प्लेइंग ईलेव्हन : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महली बियर्डमन, एडन ओ कॉनर, जेम रायन आणि जॅक निस्बेट.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद कृष्णा, सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन आणि देवदत्त पडिक्कल.