मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा पहिला डाव 408-9 धावांवर संपला आहे. साऊथ आफ्रिकेकडे आता 163 धावांची आघाडी आहे. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने 4 विकेट घेतल्या आहेत. आता टीम इंडियाल बॅकफटूवर गेली असून फलंदाजांची मोठी कसोटी असणार आहे. आफ्रिका संघाने घेतलेली आघाडी तोडत विजयासाठी मोठं लक्ष द्यावं लागणार आहे.
दोन दिवसांचा खेळ संपल्यावर आज तिसऱ्या दिवशी डीन एल्गर आणि मार्को जॅन्सन नाबाद होते. आज डावाला सुरूवात केल्यावर कोणत्याच बॉलरला विकेट मिळाली नाही. सिराज, बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा मारा सपशेल अपयशी ठरत होता. परत एकदा शार्दुल ठाकूर याने आपली जादू दाखवत कसोटीच्या पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर टिकून असलेल्या डीन एल्गर याला माघारी पाठवलं. डीन एल्गरने 287 चेंडूत 185 धावा केल्या यामध्ये त्याने 28 चौकार मारले.
डीन एल्गर आऊट झाल्यावर जेराल्ड कोएत्झी आणि मार्को जॅन्सन यांनी चांगली भागीदारी केली होती. टीम इंडियाच्या बॉलर्सला दोघांनीही अडकवून ठेवलं होतं. कोएत्झी याला अश्विनने आऊट केल्यावर बाकी राहिलेलं काम जसप्रीत बुमराहने केलं. कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर यांना बोल्ड करत आफ्रिकेला ऑल आऊट केलं. आफ्रिकेच्या नऊ विकेट गेल्या होत्या मात्र कॅप्टन टेम्बा बावुमा जखमी झाल्याने तो कसोटीत खेळत नाहीये.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर