कटक : आज टीम इंडिया (Ind Vs Sa) दुसरा टी- सामना (2nd T20) जिंकण्यासाठी साऊथ आफ्रिकेला (Indian Cricket Team) भिडली आहे. जशी टीम इंडियाची फलंदाजीची सुरूवात खराब झाली होती. तशीच साऊथ आफ्रिकेचीही खराब सुरूवात भुवनेश्वर कुमाच्या भेदक माऱ्यामुळे झाली आहे. सुरूवातीच्या षटकात भुवनेश्वरने 3 विकेट काढत मॅचमध्ये पुन्हा रंगत आणली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय कर्णधार ऋषभ पंतने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक गमावली आणि संघाला आधी बॅटिंग करावी लागली. टीम इंडियाला जरी मोठा स्कोर उभा करता आला नसला तरी भारतीय गोलंदाजीला हा स्कोर रोखण्यास खूप मोठं आव्हन नसणरा आहे. कारण भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी करत भारतीय संघाला तुर्तास दिलासा दिला आहे.
2ND T20I. WICKET! 5.3: Rassie van der Dussen 1(7) b Bhuvneshwar Kumar, South Africa 29/3 https://t.co/fLWTMjh0UQ #INDvSA @Paytm
— BCCI (@BCCI) June 12, 2022
2ND T20I. WICKET! 2.5: Dwaine Pretorius 4(5) ct Avesh Khan b Bhuvneshwar Kumar, South Africa 13/2 https://t.co/fLWTMjh0UQ #INDvSA @Paytm
— BCCI (@BCCI) June 12, 2022
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात भारताला विकेट मिळवून दिली. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने रीझा हेड्रिक्सला बोल्ड केले. हेंड्रिक्सने 3 चेंडू खेळले आणि 1 चौकाराच्या मदतीने 4 धावा केल्या. हीच घोडदौड कायम ठेवत भुवनेश्वर कुमारनेही त्याच्या दुसऱ्या षटकात जोरदार झटका दिला. त्याने षटकाच्या 5व्या चेंडूवर ड्वेन प्रिटोरियसला आवेश खानच्या हाती कॅच आऊट केले. प्रिटोरियसने 5 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 4 धावा केल्या. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याच्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रसी व्हॅन डर डुसेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डसेनने 7 चेंडूत 1 धावा काढल्या. त्यानंतर हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला.
भारतीय संघाने 20 षटकात 6 विकेट गमावून 148 धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याने 35 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि तब्बल षटकार मारले. त्याच्याशिवाय इशान किशनने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 34 धावांची शानदार खेळी खेळली. आता आफ्रिकेसाठी हेही आव्हान जड झालं आहे.