कटक : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind Vs Sa) यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-20 सामनाही (2nd T20) साऊथ आफ्रिकेने जिंकला आहे. हा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला (Indian Cricket Team) प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि भारतीय संघाने सुरूवात करत 20 षटकात 6 विकेट देत 148 धावा ठोकल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 149 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले होते, यावेळी टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 40 धावा ठोकल्या तर त्याने 35 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार सामील होती. तसेच इशान किशनने 21 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 34 धावांची शानदार खेळी केल्याचेही दिसून आले. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढतच गेल्या आणि पुन्हा एकदा भारताना कमी धावांवर समाधान मानवे लागले. त्यामुळे या सामन्यचा निकला आधीच काहीसा दिसून आला. भारताने दिलेलं आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केले.
2ND T20I. South Africa Won by 4 Wicket(s) https://t.co/fLWTMjh0UQ #INDvSA @Paytm
— BCCI (@BCCI) June 12, 2022
हेनरिक क्लासेनने आपल्या कारकिर्दीतील चौथे टी-20 अर्धशतक 32 चेंडूत पूर्ण केले. त्याने हार्दिक पंड्याच्या षटकातीलतिसऱ्या चेंडूवर 50 आपलं अर्धशतक पूर्ण करत इशादे स्पष्ट केले. त्यानंतर लगेज त्याने लाँग ऑनवर शानदार षटकार ठोकला. त्यामुळे त्याचं हे अर्धशक आफ्रिकेसाठी संकटमोचक ठरलं आहे.
भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक गोलंदाजी करत साऊथ आफ्रिकेला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय संघाला हे आव्हान पेललं नाही. सुरूवातीला अडचणीत असणाऱ्या आफ्रिकेने नंतर तडाखेबाज फलंबादाजी करत सामना खिशात घातला. भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात भारताला विकेट मिळवून ते ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने रीझा हेड्रिक्सला बोल्ड केले. तसेच दुसऱ्याच षटकात दुसरा जोरदार झटका दिला. भुवीने ड्वेन प्रिटोरियसला आवेश खानच्या हाती कॅच आऊट करत माघारी धाडले. भुवनेश्वर कुमारने त्याच्या तिसऱ्या ओव्हमध्येही हीच घोडदौड कायम ठेवत तिसऱ्या चेंडूवर रसी व्हॅन डर डुसेनला पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यामुळे सुरूवातील सामना रंगत होताना दिसला. मात्र नंतर भारताचा डाव गडगडता आता भारताला मालिका जिंकण्यासाठी उरलेले सर्व समाने जिंकण्याचं आव्हान असणार आहे.
Bhuvi picks up his third wicket as Rassie van der Dussen is bowled for just 1 run.
Live – https://t.co/pkuUUB966c #INDvSA @Paytm pic.twitter.com/AYEKuGjYeg
— BCCI (@BCCI) June 12, 2022