IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर तिलक वर्माने केला थेट आरोप, सांगितलं नेमकं काय झालं ते

| Updated on: Dec 13, 2023 | 3:56 PM

भारतीय संघ 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया मालिका खेळत आहे. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडिया बॅकफूटवर आली असून पहिल्या पराभवासाठीचं कारण तिलक वर्माने सांगितलं आहे.

IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर तिलक वर्माने केला थेट आरोप, सांगितलं नेमकं काय झालं ते
IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पराभवामुळे टीम इंडिया बॅकफूटवर, तिलक वर्माने सांगितलं पराभवाचं खरं कारण
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीकोनातून प्रत्येक टी20 सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला खेळाडूंची निवड करणं खूपच किचकट काम झालं आहे. अशात या स्पर्धेपूर्वी असलेल्या सहा टी20 मालिकांमधून योग्य त्या खेळाडूंची चाचपणी करणं सोपं होईल. भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाला आता मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी, तर दक्षिण अफ्रिका मालिका विजयासाठी धडपड करेल. भारताने 19.3 षटकात 7 गडी गमवून 180 धावा केल्या होत्या. नेमकं त्याचवेळी पावसाने हजेरी लावली आणि खेळ थांबवला. सामना पुन्हा सुरु झाला तेव्हा बराच वेळ गेला होता. म्हणून 15 षटकात 152 धावांचं टार्गेट देण्यात आलं. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 5 गडी आणि 7 चेंडू राखून जिंकला. या पराभवानंतर तिलक वर्माने आपलं मन मोकळं केलं आहे.

काय म्हणाला तिलक वर्मा?

“पॉवर प्लेमध्ये आम्ही अतिरिक्त धावा दिल्या. पण त्यानंतर आम्ही कमबॅक केलं. पण मैदानातील ओलाव्यामुळे बॉलची ग्रिप पकडणं कठीण होतं.दक्षिण अफ्रिकेत खेळणं एक चांगली अनुभूती होती. आम्ही या परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज होतो. कठीण परिस्थितीत आम्ही चांगाली फलंदाजी केली. सलामीच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. पण सूर्या, मी आणि रिंकूने चांगली बॅटिंग केली आणि धावफलकावर धावांचा डोंगर रचला.”, असं तिलक वर्मा म्हणाला.

“फलंदाजी करताना एक गोष्ट लक्षात आली की पिच स्लो आहे. खासकरून नवीन बॉलचा सामना करताना सीम होत होता. त्यानंतर फिरकीपटू मार्करम आणि शस्मीने चांगली गोलंदाजी केली. नाहीतर आम्ही आरामात 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या असत्या.”, असंही तिलक वर्मा पुढे म्हणाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू ब्रेट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, अँडीले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.