IND vs SA : आम्ही संभ्रमात होतो पण…! नाणेफेकीच्या कौल झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने खरं काय ते सांगितलं

| Updated on: Dec 12, 2023 | 8:38 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. नाणेफेकीचा कौल जिंकत दक्षिण अफ्रिकेने गोलंदाजी स्वीकारली. पण सूर्यकुमार यादवने मन मोकळेपणाने आपल्या भावना मांडल्या.

IND vs SA : आम्ही संभ्रमात होतो पण...! नाणेफेकीच्या कौल झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने खरं काय ते सांगितलं
IND vs SA : नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने, पण सूर्यकुमार यादवचा जीव पडला भांड्यात! स्पष्टच म्हणाला की..
Follow us on

मुंबई : टी२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक टी२० सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यातून टीम इंडियाची निवड करणं सोपं होईल . सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांना मालिका खेळत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर ४-१ पराभूत केलं होतं. पण विदेशी मैदानावर सूर्यकुमार यादव याच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे. कारण विदेशी धरतीवर त्याच्या नेतृत्वातील पहिलीच मालिका आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका आहे. पण पहिला सामना पावसामुळे झाला नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. एडन मार्करमने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी स्वीकारली. “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. कारण खेळपट्टीवर दिवसभर कव्हर होतं. त्यामुळे या खेळपट्टीवर चेंडू थोडाफार मूव्ह करेल असं दिसतंय.”, असं एडन मार्करमने सांगितलं. २०२४ टी२० वर्ल्डकपच्या दृष्टीने चांगली सुरुवात होईल असा आशावादही त्याने व्यक्त केला. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

काय म्हणाला कर्णधार सूर्यकुमार यादव?

“आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही येथे आहोत. पण आम्ही थोडेफार कन्फ्यूज होतो. नेमकं काय करायचं ते. पण आता मला आनंद आहे की प्रथम फलंदाजी करत आहे. हा सामना खेळणाऱ्या प्रत्येकाला संधी आहे. वर्ल्डकप सहा महिन्यांवर आहे. तुम्ही सामना खेळताना आनंद घेऊन खेळा हा संदेश दिला आहे”, असं कर्णधार सूर्यकुमार यादव याने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू ब्रेट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, अँडीले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.