नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA 2nd t20) सामन्यात भारतानं (Team India) विजय मिळवला आहे. पहिले फलंदाजी करताना भारतानं तीन बाद 237 धावा केल्या होत्या. पण, दक्षिण आफ्रिकेला हे टार्गेट पूर्ण करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय.
India seal a win to take a 2-0 lead in the series ✌?#INDvSA | Scorecard: https://t.co/jYtuRUcl0f pic.twitter.com/To2VsXsqpF
— ICC (@ICC) October 2, 2022
भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. टी-20 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सूर्यकुमार सर्वात कमी चेंडूत 1000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उजव्या हाताच्या फलंदाजाने अनेक विक्रम केले.
Milestone ? – @surya_14kumar becomes the fastest batter to get to 1000 T20I runs in terms of balls (573) faced.#TeamIndia pic.twitter.com/iaFgAX8awu
— BCCI (@BCCI) October 2, 2022
कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवा विक्रम केला आहे. कोहलीनं T20 मध्ये आपल्या 11,000 धावा पूर्ण केल्या आहेत आणि तो या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
Virat Kohli becomes the first Indian to get to 1⃣1⃣0⃣0⃣0⃣ T20 runs ??#TeamIndia pic.twitter.com/2LZnSkYrst
— BCCI (@BCCI) October 2, 2022
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं आज क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक नवा विक्रम केला. 400 T20 सामने खेळणारा तो पहिला भारतीय आणि जगातील नववा क्रिकेटपटू ठरलाय.
11व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर राहुलनं अर्धशतक पूर्ण केलं. मार्करामच्या चेंडूवर षटकार ठोकत राहुलनं आपलं अर्धशतक पूर्ण केलंय.
The joint-second-fastest T20I fifty by an India player ?#INDvSA | Scorecard: https://t.co/jYtuRUcl0f pic.twitter.com/WrJyLo5C97
— ICC (@ICC) October 2, 2022
डी कॉकनं 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर धाव घेत आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. यासाठी त्यानं 39 चेंडूंचा सामना केला.
A hard-fought half-century for Quinton de Kock ??#INDvSA | Scorecard: https://t.co/jYtuRUcl0f pic.twitter.com/GQVWI5YMXG
— ICC (@ICC) October 2, 2022
डेव्हिड मिलरनं 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. अर्शदीप सिंगनं ऑफ-स्टंपच्या बाहेर फुल लेन्थ बॉल टाकला. त्यावर मिलरनं दमदार षटकार मारला. पुढच्याच चेंडूवर मिलरने एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केलंय.