कटक : आज टीम इंडियाचा (Ind Vs Sa) मुकाबला हा साऊथ आफ्रिकेसोबत कटकमध्ये टी-20 (2nd T20) होत आहे. मात्र भारतीय संघाची सुरूवातील बॅटिंग करताना खराब सुरूवात (Indian Cricket Team) झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये भारताचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड तंबूत परतला. त्यानंतर ईशान किशान आणि श्रेयस अय्यने काही काळ मोर्चा संभाळला. यावेळी इशान किशानचे काही जबरदस्त फटकेही पाहायला मिळाले. मात्र इशान किशान बाद होताच भारताचा डाव पुन्हा गडगडला. एवढेच नाही तर 100 धावांच्या आधीच निम्मी टीम तंबूत परतली होती. त्यामुळे भारताला समाधानकारक धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेला देता आले नाही. भारतीय संघाने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावून 42 धावा केल्या. त्यानंतर मात्र भारतीय संघ हा ढासळतच गेला. टीम इंडियाने 148 धावा करत आफ्रिकेला विजयाशी 149 धावांचं आव्हान दिलं आहे.
Shreyas Iyer is the Top Performer from the first innings for his knock of 40 off 35 deliveries.
A look at his batting summary here ??@Paytm #INDvSA pic.twitter.com/tVHVLiKIlF
— BCCI (@BCCI) June 12, 2022
भारतीय संघाने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावून 42 धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने त्याच्या दुसर्या ओव्हरमद्ये फक्त 1 धाव दिली. इशान किशनला नोर्कियाने झेलबाद केले आणि त्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रसी व्हॅन डर ड्युसेनने कॅच आऊट केले. इशानने 21 चेंडूत 34 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
भारताने 7 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 50 धावा केल्या. नॉर्केच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने सिगल घेत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. 68 च्या धावसंख्येवर भारताची तिसरी विकेट पडली. कर्णधार ऋषभ पंत 5 धावा करून बाद झाला. केशव महाराजच्या पहिल्या ओव्हच्या सुरुवातीच्या चेंडूवर डुसेनने पंतला बाद केले. त्याने 7 चेंडूंचा सामना केला. 90 धावांच्या धावसंख्येवर भारताला चौथा धक्का बसला तो हार्दिक पांड्या वेन पारनेलच्या गोलंदाजीवर. हार्दिकने 12 चेंडू खेळले आणि 1 चौकार मारला.
98 धावांपर्यंत भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यर ड्वेन प्रिटोरियसकरवी हेन्रिक क्लासेनच्या हाती कॅच देत बाद झाला. अय्यरने 35 चेंडूत 2 चौकार आणि षटकार लगावत 40 धावा केल्या. भारताचा संघ अडचणीत असताना हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिकच्या जोडीने शेवटी मोर्चा संभाळला. त्यामुळे टीम इंडियाला आव्हानात्मक रन्सपर्यंत मजल मारता आली. अन्यथा टीम इंडियाचा मार्ग काही काळ तरी खडतर दिसत होता. सुरूवातीच्या ओव्हारमध्ये सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाडला सूर न गवसणेही टीमसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. आता भारतीय गोलंदाजांसमोर आफ्रिकेची चांगली फलंदाजी रोखण्याचं आव्हान असणार आहे.