मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री प्रभावशाली ठरली नाही असंच म्हणावं लागेल. दुखापतीतून सावरल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री वनडे वर्ल्डकप संघात हार्दिक पांड्याच्या जागी झाली. मात्र त्याला काही खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका पार पडली. या मालिकेतही प्रसिद्ध कृष्णाने महागडा स्पेल टाकला. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. असं असलं तरी निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याची निवड दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात केली. मात्र या मालिकेत प्रसिद्ध कृष्णा हवा तसा प्रभाव टाकता आला नाही. इतकंच काय तर सर्वात महागडा स्पेल टाकल्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याची कामगिरी काही खास झाली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात 20 षटकं टाकत 93 धावा दिल्या आणि 1 गडी मिळवण्यात यश मिळालं. तर दुसऱ्या कसोटीत अपेक्षित यश लाभलं नाही.
पहिल्या डावात प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकं टाकली आणि 10 धावा दिल्या. मात्र एकही गडी बाद करता आला नाही. दुसऱ्या डावात प्रसिद्धने 4 षटकं टाकली आणि 6.75 च्या सरासरीने 27 धावा दिल्या. त्याला 1 गडी बाद करण्यात यश आलं. पण धावा देण्याची गती पाहून ट्रोलर्सने त्याच्यावर निशाणा साधला आहे. एकिकडे फलंदाज एक एक धावेसाठी झुरत असताना प्रसिद्ध कृष्णा धावा देत होता. त्यासाठी सोशल मीडियावर त्याच्या नावाने उदो उदो केला जात आहे. इतकंच काय तर डिंडा क्लबमध्ये एन्ट्री मारल्याची टीकाही काही जणांनी केली आहे.
If Loyalty had a face.
It's Prasidh Krishna 🫡
20 runs over when the opposition is 7 down😭 pic.twitter.com/FWyn6713VV— Dinda Academy (@academy_dinda) January 4, 2024
Bahar ana Prasidh Krishna zara baat karni hai pic.twitter.com/kBpa2Szd8C
— nipun mahajan (@NiPuN_045) January 4, 2024
When everyone was struggling to bowl , Lord Prasidh single handedly gave runs at an economy 6.8
It’s High Time We Should Declare Dinda Academy As Lord Prasidh Krishna Academy pic.twitter.com/6b71TttRPW
— Chinmay Shah (@chinmayshah28) January 4, 2024
Prasidh Krishna brother 😭💔🙏 pic.twitter.com/8kkNPXEMoQ
— Aditya Saha (@Adityakrsaha) January 4, 2024
प्रसिद्ध कृष्णाने दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याच्या नावावर एकही धाव नाही. तर दोन सामन्यातील 3 डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळली. यात त्याने 130 धावा दिल्या आणि एकूण 2 गडी बाद केले. आता दुसऱ्या कसोटीत भारताच्या झटपट विकेट गेल्या तर फलंदाजीची संधी मिळू शकते.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी