मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील तिसरा वन डे सामना आज पार पडणार आहे. करो या मरो सामन्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा सामना बोलंड पार्क येथे होणार असून तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघ 1-1 सामना जिंकत बरोबरीत आहेत. आजच्या सामन्यात संघात काही बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाचा तुम्हाला पाहण्यासाठी तुमची टीम लावण्यासाठी मदत होईल.
कॅप्टन- संजू सॅमसन
उपकर्णधार – अर्शदीप सिंह
विकेटकीपर-केएल राहुल,
फलंदाज- रीजा हेंड्रिक्स, टोनी डी जॉर्जी, साई सुदर्शन
ऑलराउंडर- एडेन मार्करम
गोलंदाज- नंद्रे बर्गर, केशव महाराज, ब्यूरन हेंड्रिक्स, आवेश खान
टीम इंडियाने पहिल्या वन डे सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात कमबॅक करत टीम इंडियाला 8 विकेटने पराभू करत मालिकेत बरोबरी साधली. आजचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असणार आहे. टीम इंडियाचा युवा खेळाडू साई सुदर्शन दोन्ही सामन्यात मजबूत बॅटींग करत आहे. पठ्ठ्याने सलग दोन सामन्यात अर्धशतके केली आहेत. त्यामुळे साईचा फॉर्म पाहता त्याच्याकडून परत एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
टीम इंडियाचा गोलंदाज अर्शदीप सिंह चांगलाच प्रभावी ठरला आहे पहिल्या सामन्यात पाच विकेट त्याने घेतल्या हो्त्या. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेच्या शतक ठोकलेल्या खेळाडूने सुरूंग लावत भारतीय गोलंदाजांचा घामटा काढला होता. आजही अर्शदीप प्रभावी माऱ्याची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान , अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.