मुंबई | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना हा 1 डिसेंबर रोजी रायपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार बीसीसीआय निवड समितीने टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव आणि वनडे सीरिजसाठी केएल राहुल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तर कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माच कर्णधारपद सांभाळणार आहे.
टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये रोहित आणि विराट या दोघांच्या विनंतीनंतर त्यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्याकडेच कॅप्टन्सी आहे. तर केएलला एकदिवसीय मालिकेसाठी सूत्र दिली आहेत. तर विराट आणि रोहित दोघेही टेस्ट सीरिजमधून कमबॅक करणार आहेत. निवड समितीने कसोटी मालिकेसाठी स्पेशालिस्ट अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना डच्चू दिला आहे. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना कसोटी मालिकेत समावेश केला गेला आहे.
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना कसोटी मालिकेत संधी न दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे दोन्ही खेळाडूंचं करियरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या दोघांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. मात्र दोघांना त्यांच्या लौकीकाला साजेशी अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या दोघांना टेस्ट सीरिजमध्येही स्थान देण्यात आलं नाही. रहाणेने अखेरचा कसोटी सामना हा वेस्टइंडिज विरुद्ध या वर्षी खेळला होता. मात्र रहाणेला तेव्हा काही विशेष करता आलं नाही. तर चेतेश्वर पुजारा यानेही जून महिन्यात अखेरची कसोटी खेळली.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
India’s squad for 2 Tests: Rohit Sharma (C), Shubman Gill, Yashasvi Jaiswal, Virat Kohli, Shreyas Iyer, Ruturaj Gaikwad, Ishan Kishan (wk), KL Rahul (wk), Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Mohd. Shami*, Jasprit Bumrah (VC), Prasidh…
— BCCI (@BCCI) November 30, 2023
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी (फिटनेसवर अवलंबून) आणि प्रसीध कृष्णा.
पहिला सामना, 26 ते 30 डिसेंबर, सेंचुरियन.
दूसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, केपटाउन.