IND vs SA T20i : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 भारतीय गोलंदाज, नंबर 1 कोण?

| Updated on: Nov 05, 2024 | 4:33 PM

India vs South Africa T20i Series: टीम इंडिया सूर्युकमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर कोण? जाणून घ्या.

IND vs SA T20i : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 भारतीय गोलंदाज, नंबर 1 कोण?
shardul siraj gill team india
Image Credit source: Bcci
Follow us on

टीम इंडिया टी 20i मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर व्ही व्ही एस लक्ष्मण हे भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20i मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 3 गोलंदाजांना संधी मिळालेली नाही. या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार याने टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वरने 12 सामन्यांमध्ये 6.69 च्या इकॉनॉमी रेटने 14 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियापासून दूर आहे.

आर अश्विन

आर अश्विन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने 10 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र अश्विन गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे.

अर्शदीप सिंह

अर्शदीप सिंह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. अर्शदीप सिंह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली आहे.

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. हार्दिकने 12 सामन्यांमध्ये 9 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हार्दिकचाही या दौऱ्यात समावेश करण्यात आला आहे.

हर्षल पटेल

हर्षल पटेल या यादीत पाचव्या स्थानी आहे. हर्षल पटेलने 8 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. हर्षल पटेल टीम इंडियापासून दूर आहे. हर्षलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना हा 2021 साली खेळला होता.

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.