IND vs SA T20 : टॉस गमवला तरी कर्णधार सूर्यकुमार यादव आनंदी, म्हणाला…

| Updated on: Nov 08, 2024 | 8:29 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला टी20 सामना डरबनमध्ये सुरु झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज घेऊन एडन मार्करमने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तरीही कर्णधार सूर्यकुमार यादव आनंदी होता.

IND vs SA T20 : टॉस गमवला तरी कर्णधार सूर्यकुमार यादव आनंदी, म्हणाला...
Follow us on

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 4 सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना डरबनमध्ये होत आहे. या सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्याने हा सामना होईल की नाही याबाबत शंका होती. मात्र पावसाने दडी मारल्याने सामना होणार यावर शिक्कामोर्तब लागला. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. कर्णधार एडन मार्करमने खेळपट्टीचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार एडन मार्करमने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खूपच चांगली विकेट दिसते. या आठवड्यात थोडा पाऊस झाला आहे आणि जर ओलावा असेल तर आम्हाला त्याचा वापर करावा लागेल. संघ सहकाऱ्यांना घरच्या मैदानावर पदार्पण करण्याची विलक्षण संधी आणि त्यांच्यासाठी खेळाचा आनंद घेण्याची ही उत्तम वेळ आहे. आम्ही खूप स्पर्धात्मक संघ आहोत आणि आम्ही सकारात्मक परिणाम कसे मिळवू शकतो यावर चर्चा झाली आहे.’

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीनंतर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. विकेट छान दिसते आहे, सराव विकेटपेक्षा चांगली आहे आणि आम्ही नक्कीच बोर्डवर चांगला धावा लावण्याचा प्रयत्न करू. ड्रेसिंग रूममधील मुलांनी माझे काम सोपे केले आहे, ते त्यांच्या संबंधित फ्रँचायझींसाठी ज्या निर्भय दृष्टिकोनाने खेळतात आणि तोच दृष्टिकोन संघात आणला आहे.’, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर.

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान.