मुंबई | बीसीसीआय निवड समितीने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या तिन्ही मालिकेसाठी टीम इंडियाचं 3 खेळाडू नेतृत्व करणार आहेत. लांबलचक असा दौरा असल्याने निवड समितीने सर्वच खेळाडूंना या दौऱ्यासाठी संधी दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांना टेस्ट सीरिजमधून डच्चू देण्यात आला आहे.
तर दुसऱ्या बाजूला निवड समितीने 3 युवा खेळाडूंची पहिल्यांदा भारतीय संघात निवड केली आहे. यामध्ये साई सुदर्शन, रिंकू सिंह आणि रजत पाटीदार या दोघांची निवड केली आहे. या दोघांना एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. टीम इंडिया एकूण 3 वनडे मॅच खेळणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रिंकू सिंह याने याआधीच टीम इंडियाकडून टी 20 पदार्पण केलं आहे. रिंकू सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला साई सुदर्शन आणि रजत पाटीदार या दोघांची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान रजत पाटीदार याने आयपीएलमध्ये आरसीबीचं प्रतिनिधित्व केलं आहे. रजत पाटीदार याने आयपीएलमधील 12 सामन्यांमध्ये 144.29 च्या स्ट्राईक रेटने 404 धावा केल्या आहेत. तर साई सुदर्शन हा गुजरात टायटन्सचा भाग आहे. साईने गुजरातकडून खेळताना 13 सामन्यांमध्ये 507 धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.