मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना जिंकण्याची भारताला सर्वाधिक संधी आहे. खेळपट्टी फलंदाजीला पूरक नसली तरी विजयासाठी दिलेल्या धावा नाममात्र आहेत. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 55 धावांवर बाद झाला होता. त्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 153 धावा करत 98 धावांची आघाडी घेतली होती. ही आघाडी मोडीत काढत आता दक्षिण अफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 78 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण अफ्रिकेकडून दुसऱ्या डावात एडन मार्करम वगळता कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. एक एक करत मैदानात हजेरी लावून परतत होते. एडन मार्करमने 103 चेंडूत 106 धावांची खेळी केली. पण एडन मार्करमची फलंदाजी पाहून विराट कोहलीने जुना टोटका वापरला. त्यामुळे मार्करमला काही अंशी घाम फुटला. कारण पहिल्या कसोटीत जेव्हा असं केलं होतं तेव्हा दोन चेंडूनंतर विकेट गेली होती.
षटकाच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर एडन मार्करमने सलग दोन चौकार मारले. त्यानंतर शेवटच्या चेंडूआधी विराट कोहली स्टंपजवळ गेला आणि त्याने बेल्स बदलल्या. विराट कोहलीची ही कृती पाहून मार्करम संतापलेला दिसला. पंचांनी विराट कोहलीला या कृतीसाठी दम भरला. पहिल्या कसोटीत जेव्हा डीन एल्गर आणि डी जॉर्जी ही भागीदारी तुटता तुटत नव्हती तेव्हा विराटने हा टोटका वापरला होता. दोन चेंडूनंतर विकेट मिळाली होती. त्यामुळे मार्करम संतापलेला दिसला होता. पण शेवटच्या चेंडूवर त्याला बॉल डिफेंड केला आणि स्वत:ला वाचवलं.
Virat Kohli again changed the bails but unfortunately india didn't get wicket of makkram #ViratKohli #viralvideo #SAvsIND #INDvsSA #RohitSharma𓃵 pic.twitter.com/2DCNA61RN1
— ABHI THAKUR (@_anonymous_5it) January 3, 2024
Kohli swapped the bails at the striker's end before the final ball to play mind games with Markram😁. However, Markram successfully defended the final ball of the day.#INDvsSA pic.twitter.com/b1ehA3QEB0
— Deepak Prakash (@Deepakprksh) January 3, 2024
भारतासमोर विजयासाठी आता 79 धावांचं आव्हान आहे. पण हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. कारण दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत 7 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना सावधपणे फलंदाजी करत विजयी धावा गाठव्या लागतील. अन्यथा हा विजय सुद्धा कठीण होईल.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी