IND vs SA : मोहम्मद सिराजने सांगितलं भेदक गोलंदाजीमागचं रहस्य, नेमका काय प्लान होता आणि कसं झालं ते सर्वकाही

| Updated on: Jan 04, 2024 | 7:38 PM

दक्षिण अफ्रिकेत टीम इंडियाच्या मनासारखं घडलं. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज विजयाचे शिल्पकार ठरले. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेला 55 धावांवर रोखण्यात सिराजचा हात होता. आता या मागचं सर्व गुपित त्याने उलगडलं आहे.

IND vs SA : मोहम्मद सिराजने सांगितलं भेदक गोलंदाजीमागचं रहस्य, नेमका काय प्लान होता आणि कसं झालं ते सर्वकाही
IND vs SA : मोहम्मद सिराजच्या यशामागे घडलं होतं असं काही, सामन्यानंतर बरंच काही सांगून टाकलं
Follow us on

मुंबई : भारताने दक्षिण अफ्रिकेत 13 वर्षानंतर कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याची किमया साधली आहे. दोन दिवसात संपलेल्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन संघाला डोकं वर काढता आलं नाही. पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण अफ्रिका बॅकफूटवर गेली. पहिल्या डावात त्याने 6 गडी बाद केले. सिराजच्या या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 55 धावांवर बाद आणि पहिल्या डावात भारताला अपेक्षित आघाडी घेता आली. भारताने सर्वबाद 153 धावा केल्या आणि 98 धावांची सरशी घेतली. त्यामुळे या धावा गाठून विजयासाठी मोठ्या धावसंख्या देणं कठीण झालं. भारतासमोर अवघ्या 79 धावांचं आव्हान आणि ते सहजरित्या पारही केलं. पण पहिल्या डावात सिराजच्या जबरदस्त कामगिरीचं रहस्य काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अखेर मोहम्मद सिराजने यामागचं रहस्य उघड केलं आहे. या सामन्यासाठी कशी तयारी केली होती आणि कोणी मदत केली याबाबत सांगितलं.

“पहिल्या सामन्यात जास्त यश मिळाल नाही. त्यामुळे नेमकी काय चूक होते हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे पुढच्या सामन्यात काय करायला हवं याचा अंदाज आला होता. व्हिडीओ न पाहता काय चुकतं याबाबत लक्षात आलं होतं. पहिल्यांदा यश मिळताना दिसलं नाही. त्यानंतर फक्त चेंडू व्यवस्थितरित्या सोडण्यावर लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळे चेंडू पडल्यानंतर जबरदस्त जात होता आणि विकेटही मिळाले.”, असं मोहम्मद सिराजने सांगितलं.

“सामना सुरु झाला तेव्हा पटापट विकेट मिळतील याचा अंदाज नव्हता. पण कसोटीत गोलंदाजीत भागीदारीही तितकीच महत्त्वाची आहे. बुमराह दुसऱ्या बाजूने जबरदस्त गोलंदाजी करत होता त्याला यश मिळालं. बुमराह फलंदाजांवर दबाव टाकत होता. त्याचा फायदा मला झाला आणि विकेट मिळत गेले.”, असं मोहम्मद सिराजने सांगितलं. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने 9 षटकं टाकली आणि 15 धावा देत 6 गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने 9 षटकं टाकत 31 धावा दिल्या आमि 1 गडी बाद करण्यात यश आलं.