IND vs SA : तिसऱ्या टी20 सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट! कर्णधार उपकर्णधारासाठी तुमची निवड होईल सोपी

| Updated on: Dec 13, 2023 | 7:53 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तिसरा टी20 सामना 14 डिसेंबर रोजी होणार आहे. तीन सामन्यातील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळला. तर आता तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारते? याकडे लक्ष लागून आहे. पण या पलीकडे कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात ते जाणून घेऊयात

IND vs SA : तिसऱ्या टी20 सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट! कर्णधार उपकर्णधारासाठी तुमची निवड होईल सोपी
IND vs SA : तिसऱ्या टी20 सामन्यात हे खेळाडू करू शकतात स्वप्नपूर्ती! जाणून घ्या कोणती निवड ठरू शकते फायद्याची
Follow us on

मुंबई : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या सामन्यात भारताला बरोबरी साधावी लागेल. अन्यथा मालिका 2-0 ने गमवावी लागेल. पहिला सामना पावसामुळे वाया गेला. तर दुसऱ्या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट देण्यात आलं.  भारताने 19.3 षटकात 180 धावा केल्या होत्या. पण पावसामुळे दक्षिण अफ्रिकेला 15 षटकात 152 धावांचं आव्हान देण्यात आलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 5 गडी गमवून पूर्ण केलं. आता भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसरा साना जोहान्सबर्गमध्ये होणार आहे. मैदान आणि परिसरात पावसाची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे 20 षटकांचा खेळ खेळला जाईल. 56 टक्के आर्द्रतेसह, तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. जमिनीवर वाऱ्याचा वेग 26 किमी/ताशी असेल. खेळपट्टीबद्दल बोलायचं तर इथली खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप अनुकूल आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 26 वेळा आमनेसामने आले आहते. यावेळी भारताने 13 आणि दक्षिण अफ्रिकेने 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. तिसऱ्या सामन्यातही रिंकू सिंह याच्यावर नजर असेल. पण शुबमन गिलची बॅट तळपली, तर त्याच्यापर्यंत फलंदाजी येणं कठीण आहे. त्यामुळे पॉइंट्सच्या गणितात रिंकूची निवड योग्य ठरेल की नाही हे त्या दिवशीच कळेल. रिंकू सिंहला संघात घेतलं तरी त्याला कर्णधारपद द्यायचं की नाही ज्याचा त्याचा निर्णय आहे.

ड्रीम इलेव्हन : इशान किशन, शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिझा हेंड्रिक्स, रवींद्र जडेजा, मार्को यानसेन (उपकर्णधार), मुकेश कुमार, केशव महाराज, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, इशान किशन, रवींद्र जडेजा, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रीत्झके, ट्रिस्टन स्टब्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, मार्को यानसेन, तबरेझ शम्सी