नवी दिल्ली : सध्या गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा (IND vs SA)) सामना सुरु आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयनं (BCCI) एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे अवघ्या क्रीडाविश्वाचं लक्ष याकडे लागून आहे. यानिमित्तानं नव्यांना संधी मिळणार आहे. तर काम बोलता है भाई, या वाक्याचाही पुन्हा एकदा प्रत्येय आलाय.
बीसीसीआयनं भारतीय संघाची यावेळी घोषणा केली असून शिखर धवनला संघाचा कर्णधार बनवण्यात आलंय. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आलंय. भारतीय संघाला 6 ते 11 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेसोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
? NEWS ?: India’s squad for ODI series against South Africa announced. #TeamIndia | #INDvSA | @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 2, 2022
दोन्ही संघ सध्या तीन सामन्यांची T20I मालिका खेळत आहेत. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत वनडे मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हे विशेष.
मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदार आणि पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांचा प्रथमच एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
मोहम्मद शमी व्यतिरिक्त T20 विश्वचषकासाठी भारताचे सर्व राखीव खेळाडू – दीपक चहर, श्रेयस अय्यर आणि रवी बिशोई यांची मालिका खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये दुसरा 9 ऑक्टोबरला रांचीमध्ये आणि तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत खेळवला जाईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाणून घ्या….
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विश्वभुमी), संजू सॅमसन (विश्वभूमी) ), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार आवेश खान, मोहम्मद.सिराज, दीपक चहर.