गुवाहाटी : टीम इंडियाने श्रीलंकेचा (IND vs SL) पहिल्या वनडे मॅचमध्ये 67 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने (Indian Cricket Team) पहिले बॅटिंग करताना श्रीलंकेला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं. मात्र श्रीलंकेला निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 306 रन्सच करता आल्या. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यामुळे श्रीलंकेची एकावेळेस 7 बाद 179 अशी स्थिती होती. श्रीलंकेवर पराभवाची टांगती तलवार होती. मात्र कर्णधार दासून शनाकाने (Dasun Shanaka) एकट्याने खिंड लढवली. त्याने श्रीलंकेला 300 पार पोहचवलं. शनाकाने सर्वाधिक 108 धावांची खेळी केली. शनाकाच्या वनडे क्रिकेटमधील हे दुसरं शतक ठरलं. (ind vs sl 1st odi team india mohammed shami mankaded to dasun shanaka and captain rohit sharma withdraw run out appeal at non striker end)
शनाकाच्या या शतकात भारतीय कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) मोठं योगदान राहिलं. रोहितने प्रत्येकाचं मन जिंकलं. श्रीलंका सामन्यात पिछाडीवर होती. पण शेवटच्या ओव्हरमध्ये शनाकावर प्रत्येकाचं लक्ष होत. शनाका आपल्या शतकापासून 2 धावा दूर होता आणि बॉल शिल्लक होते फक्त 3.
शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर शनाका नॉन स्ट्राइक एंडवर होता. स्टाइकवर रजीथा होता. शमी चौथा बॉल टाकणारच होता तेवढ्यात त्याने क्रीझबाहेर गेलेल्या शनाकाला मंकडिंग केलं. शमीने रन आऊटसाठी अपील केली. मात्र रोहितने ती अपील मागे घेतली आणि शनाकाला परत मागे येण्याचा इशारा केला. यानंतर शनाकाने 5 व्या बॉलवर फोर मारत शतक पूर्ण केलं. तसेच शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून शनाका नाबाद परतला. रोहितच्या या खिलाडूवृत्तीचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक होतंय.
Captain @ImRo45 explains why he withdrew the run-out appeal at non striker’s end involving Dasun Shanaka.#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/ALMUUhYPE1
— BCCI (@BCCI) January 10, 2023
शनाकाने एकूण 88 बॉलमध्ये 108 धावा केल्या. शनाकाने या खेळीत 12 चौकार आणि 3 सिक्स लगावले. सामना टीम इंडियाने जिंकला. मात्र शनाकाच्या झुंजार खेळीमुळे श्रीलंकेला टीम इंडियाला शेवटच्या बॉलपर्यंत झुंज देता आली.
दरम्यान या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा आणि महत्तावाचा सामना हा 12 जानेवारीला कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.