Virat Kohli Angry on Hardik Pandya : विराट कोहलीने (Virat Kohli) 2023 या नववर्षाची शानदार सुरुवात केली. विराटने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL) शतक झळकावलं. विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 73 वं शतक ठरलं विराटने या शतकासह सचिन तेंडुलकरच्या भारतातील एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विराट या खेळीदरम्यान चांगलाच संतापलेला दिसला. विराटचा हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रागात डोळे दाखवतानाचा फोटो व्हायरल झालाय. हार्दिक आणि विराटमध्ये असं नक्की काय झालं, हे आपण माहित करुन घेऊयात. (ind vs sl 1st odi virat kohli angry on hardik pandya due to lazy running and not given strike)
हार्दिकने विराटला स्ट्राईक दिली नाही. त्यामुळे विराट संतापला. हा सर्व प्रकार टीम इंडियाच्या डावातील 43 व्या ओव्हरमध्ये घडला. विराटने लेग साईडला बॉल मारला. विराटने पहिली धाव जोरात धावत पूर्ण केली. तर दुसऱ्या धावेसाठी विराटने हाफ पीच धावून आला. मात्र विराटला परत मागे जावं लागलं. हार्दिक दुसऱ्या धावेसाठी इच्छूक नसल्याने विराटला मागे फिरावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला हार्दिकला स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती. त्यामुळे हार्दिकने विराटला दुसऱ्या धावेसाठी नकार दिला.
हा सर्व प्रकार झाला तेव्हा विराट 81 धावांवर खेळत होता. तर हार्दिक 10 धावांवर नॉट आऊट होता. विराटला हार्दिकची ही कृती अजिबात पटली नाही. त्यामुळे विराटने हार्दिककडे एकटक रागात पाहिलं.
विराट हार्दिकवर संतापला
— Bleh (@rishabh2209420) January 10, 2023
दरम्यान विराटने या सामन्यात 113 धावांची विक्रमी खेळी केली. विराटने 113 धावांच्या खेळीत 1 सिक्स आणि 12 फोर लगावले. विराटचां हे सलग दुसरं शतक ठरलं. विराटने याआधीही 10 डिसेंबरला बांगलादेश विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 113 धावाच केल्या होत्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.