IND vs SL : शुबमन गिल आयपीएलमध्ये बॉलिंग करणार का? कॉमेट्रीवेळीच कोच आशिष नेहराने केला खुलासा

| Updated on: Aug 02, 2024 | 5:40 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचे काही फलंदाज असलेले खेळाडू बॉलिंग करताना दिसत आहेत. यामध्ये शुबमन गिलसुद्धा एक असून श्रीलंकेविरूद्धच्या वन डे सामन्यातही रोहितने त्याला बॉलिंग दिली. त्यामुळे आयपीएलमध्येही तो बॉलिंग करणार की नाही याबाबत कॉमेट्री करताना कोच आशिष नेहराने खुलासा केलाय.

IND vs SL : शुबमन गिल आयपीएलमध्ये बॉलिंग करणार का? कॉमेट्रीवेळीच कोच आशिष नेहराने केला खुलासा
Follow us on

टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील वन डे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरू असून श्रीलंका संघाने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत श्रीलंकेला बॅकफूटला ढकललं आहे. श्रीलंकेचा अर्धा संघ अवघ्या 101 धावांवर आऊट झाला. या सामन्यात रोहित शर्माने उपकर्णधार असलेल्या शुबमन गिल याला बॉलिंग दिली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये गिल बॉलिंग करणार का? असा सवाल कॉमेट्री करत असलेल्या गुजरात टायटन्सचे कोच आशिष नेहरा यांना केला.

शुबमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यात ओव्हर टाकत असल्याने तो आयपीएलमध्येही बॉलिंग करणार का? याबाबत आशिष नेहराने स्पष्ट शब्दात नकार दिला. अजिबात नाही, शुबमन कॅप्टन असेल तर काय झालं? तो काहीही करेल का? गुजरातमध्ये जयंत यादव याने अजुन एकच सामना खेळला आहे. तर राहुल तेवतियालाही अजुन संधी मिळालेली नाही. त्यामुळ रोहितने त्याला बॉलिंग दिली तर माझ्या कोचिंगमध्ये हे बसत नसल्याचं सांगत आशिष नेहरा गिल बॉलिंग करणार या चर्चांणा पुर्णविराम दिला.

टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वन डे सामन्यामध्ये रोहित शर्मा याने एका मॅचनविनरला खाली बसवलं. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ पंत असून त्याच्या जागी के. एल. राहुल याची निवड केली गेली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.