IND vs SL, 1st T20I : टीम इंडियाकडून श्रीलंकेवर 2 धावांनी मात, शिवम मावीचा पदार्पणात धमाका

| Updated on: Jan 03, 2023 | 11:39 PM

टीम इंडियाने (Team India) थरारक झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर (Sri Lanka) 2 धावांनी विजय मिळवला आहे.

IND vs SL, 1st T20I : टीम इंडियाकडून श्रीलंकेवर 2 धावांनी मात, शिवम मावीचा पदार्पणात धमाका
Image Credit source: बीसीसीआय
Follow us on

मुंबई : टीम इंडियाने (Indian Cricket Team) नववर्षाची विजयी सुरुवात केली आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात टीम इंडियाने टी 20 मालिकेतील पहिला सामन्यात 2 धावांनी विजय मिळवला आहे. यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला (IND vs SL) विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला शेवटच्या बॉलवर ऑलआऊट केलं. शिवम मावी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. मावीने पदार्पणातील सामन्यातच 4 विकेट्स घेतल्या. (ind vs sl 1st t20i team india beat sri lanka by 2 runs debutant shivam mavi shines take 4 wickets at mumbai wankhede stadium)

मावीचा हा पहिलाच टी 20 सामना होता. आपला पदार्पणातील सामना अविस्मरणीय व्हावा, अशी प्रत्येक नव्या खेळाडूची इच्छा असते. मात्र मावीने यापलीकडे जाऊन शानदार कामगिरी केली. मावीने पाथुम निसांका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा आणि महेश तीक्ष्णा या चौकडीला आऊट केलं.

मालिकेत 1-0 ने आघाडीवर

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा आणि सीरिज डिसायडर सामना हा पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये 5 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका विजयाची संधी आहे. तर श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळवावाच लागेल. त्यामुळे दुसरा सामना हा रंगतदार होईल, याबाबत शंकाच नाही.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निशंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चारिथा असालंका, भानुका राजपक्षा, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, कासुन रचिता आणि दिलशान मधुशंका.