IND vs SL : टीम इंडियाकडून ‘या’ 2 खेळाडूंचं पदार्पण, कोण आहेत ते?

| Updated on: Jan 03, 2023 | 7:34 PM

IND vs SL : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला टी 20 सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

IND vs SL : टीम इंडियाकडून या 2 खेळाडूंचं पदार्पण, कोण आहेत ते?
Follow us on

मुंबई : श्रीलंकेने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाकडून या पहिल्या सामन्यातून 2 युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. शुबमन गिल आणि शिवम मावी या दोघांना टीम मॅनेजमेंटने पदार्पणाची संधी दिली आहे. बीसीसीआयने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. (ind vs sl 1st t20i team india shivam mavi and shubhaman gill makes his debut against sri lanka at wankhede stadium mumbai)

मावी आणि गिल या दोघं जवळपास 5 वर्षांआधी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळले होते. त्यानंतर आता दोघांनी टी 20 डेब्यू केलं आहे. मात्र अर्शदीप सिंहला बाहेर बसावं लागलं आहे. अर्शदीपच्या जागी मावीला संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा युवा ब्रिगेड मैदानात उतरला आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन

दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निशंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चारिथा असालंका, भानुका राजपक्षा, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीश तीक्षणा, कासुन रचिता आणि दिलशान मधुशंका.