मुंबई : कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ 4 मार्च रोजी मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा पहिलाच सामना असेल, तर विराट कोहलीच्या (Virat Kohli) कारकिर्दीतील ही 100 वी कसोटी असेल. पण टीम इंडियाचे (Team India) भवितव्यही या सामन्यातून दिसणार आहे, कारण हा सामना भारतीय संघ चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेशिवाय खेळणार आहे. भारताला यावर्षी फक्त तीन कसोटी सामने खेळायचे आहेत, त्यापैकी दोन या मालिकेत आणि एक सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचे संघात पुनरागमन या तिन्ही सामन्यांमध्ये कठीण आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी ज्या खेळाडूंना संधी मिळेल, तेच भविष्यातील कसोटी संघाचा पाया रचणार आहेत.
मोहालीत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवाल कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला मैदानात उतरु शकतो. अशा स्थितीत शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर आणि हनुमा विहारीला सहाव्या क्रमांकावर संधी मिळू शकते.
शुभमन गिलने ऑस्ट्रेलियात सलामीवीर म्हणून कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती, आता केएल राहुल संघात नाही, त्यामुळे मयंक अग्रवाल ओपनिंगची जबाबदारी सांभाळू शकतो. शुभमन गिलला संघ व्यवस्थापनाला टॉप ऑर्डरमध्ये ठेवायचे आहे.
माजी निवडकर्ते देवांग गांधी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, शुभमन गिल भारतासाठी कसोटीत तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज असेल. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केले तेव्हा देवांग गांधी निवडकर्ते होते.
विशेष म्हणजे टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंतला मैदानात उतरवू शकते, म्हणजेच विराट कोहलीनंतर पंत फलंदाजीला येईल आणि शेवटी हनुमा विहारी डाव सांभाळण्यासाठी उपस्थित असेल. ऋषभ पंतने अलीकडच्या काळात कसोटीत चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याच्या बढतीचा संघाला फायदा होऊ शकतो. मात्र, पदार्पणातच शतक झळकावणारा श्रेयस अय्यर प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवू शकेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)
Test squad – Rohit Sharma (C), Priyank Panchal, Mayank Agarwal, Virat Kohli, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Shubhman Gill, Rishabh Pant (wk), KS Bharath, R Jadeja, Jayant Yadav, R Ashwin, Kuldeep Yadav, Sourabh Kumar, Mohd. Siraj, Umesh Yadav, Mohd. Shami, Jasprit Bumrah (VC).
— BCCI (@BCCI) February 19, 2022
इतर बातम्या
IND vs SL: ‘गवताला पाणी मिळाल नाही की…’ चहलने आपल्याच मित्राला कॅमेऱ्यासमोर केलं ट्रोल, पहा VIDEO
IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट