मोहाली : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहाली (Mohali Test) येथे खेळवला जात आहे. या सामन्यावर भारतीय संघाने (Team India) चांगली पकड मिळवली आहे. भारतीय सघाने पहिले दोन्ही दिवस आपल्या नावे केले आहेत. रवींद्र जडेजाच्या नाबाद 175 धावा, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. त्यानंतर गोलंदाजीमध्येही झटपट विकेट मिळवत दुसरा दिवस संपताना भारताकडे 466 धावांची आघाडी आहे. तर श्रीलंकेची परिस्थिती बिकट आहे. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची अवस्था 4 बाद 108 अशी केली आहे. गोलंदाजीमध्ये आश्विनने 2 आणि जाडेजा, बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.
टीम इंडियाने कालच्या 6 बाद 357 धावांवरुन आज भारताने 8 बाद 574 पर्यंत मजल मारली. आज जडेजा आणि अश्विन ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने सुरुवातीपासून धावफलक हलता ठेवल्यामुळे भारतीय संघाने 550 धावांचा टप्पा ओलांडला. आज सुरुवातीपासून मैदानावर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळतेय. जडेजा आणि अश्विन या जोडीने शतकी भागिदारी केली. तर जडेजाने दमदार खेळीच्या जोरावर 161 चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले. अजूनही जडेजा मैदानवर पाय रोवून असून सध्या जेवणाचा ब्रेक झाला आहे. तर दुसरीकडे आर अश्विननेही उत्कृष्ट खेळी करत 61 धाव्या केल्या. त्यानंतर आलेल्या जयंत यादवला (02) मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर मोहम्मद शमी मैदानात आला. त्याने जडेजाला सुरेख साथ देत नाबाद 103 धावांची भागीदारी केली. शमी 20 तर जडेजा 175 धावांवर नाबाद परतले. तत्पूर्वी पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली 45 धावा करुन तंबूत परतला होता. श्रीलंकेकडून सुरंगा लकमलने 90 धावात 2, विश्वा फर्नांडोने 135 धावात 2, लसिथ एम्बुलदेनियाने 188 धावात 2 बळी घेतले. तर धनंजय डी सिल्वा आणि लाहिरु कुमाराने प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताने 574 धावांवर डाव घोषित केल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर पहिल्या डावातील फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आले. पण सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. आश्विनने 2 आणि जाडेजा, बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेत दिवसअखेर श्रीलंकेची अवस्था 108 वर 4 बाद अशी केली असून सध्या पाथुम निसांका (26) आणि चरित असलांका (1) क्रिजवर आहेत.
रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शतक पूर्ण केले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक होते. यानंतर, त्याने दुसऱ्या सत्रातही आपली शानदार फलंदाजी सुरू ठेवली आणि डाव घोषित होण्यापूर्वी 175 धावा केल्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी तर ठरलीच पण 36 वर्ष जुना विक्रमही त्याने मोडीत काढला. जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्या आधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता, ज्यांनी 1986 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 7 व्या क्रमांकावर खेळताना 163 धावा केल्या होत्या.
इतर बातम्या
IND vs SL: रोहितने विराटला मैदानात दिला असा खास सन्मान, जे बोलला ते करुन दाखवलं, पहा VIDEO
IND vs PAK, Women’s World Cup 2022: भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला, विजयासाठी होणार भीषण संग्राम