भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. या मैदानावर 200च्या वर धावा करणं कठीण आहे. तसेच फिरकीला मदत करणारी खेळपट्टी असल्याने भारतीय क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. कारण श्रीलंकेने पहिल्या सामन्यात फक्त 230 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला गाठता आलं नाही आणि सामना बरोबरीत सुटला. आता श्रीलंकेने याच मैदानात त्याच खेळपट्टीवर 50 षटकात 8 गडी गमवून 240 धावा केल्या आहेत आणि 241 धावा जिंकण्यासाठी दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्याच्या तुलनेत 10 धावा जास्त आहेत. असं असताना हे आव्हान भारतीय फलंदाजांना पेलवेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. प्रत्येकवेळी तसंच होतं असं नाही. कदाचित हा सामना लवकरही संपू शकतो. दुसरीकडे, या सामन्यात रोहित शर्माचं आक्रमक पण मजेशीर रूप पाहायला मिळालं. एकच चुकी वारंवार केल्याने रोहित शर्मा संतापला आणि स्वत:ला रोखू शकला नाही.
कर्णधार रोहित शर्मा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याच्यावर मजेशील राग काढला. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करताना अनेकदा धाव घेताना चुकला आणि गोलंदाजी करताना थांबला. श्रीलंकेच्या 33व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने असं तीनवेळा केलं. त्यामुळे स्लिपला उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा वैतागला. तसेच मजेशीर अंदाजात त्याच्या मागे मारण्यासाठी धावला. खरं तर हा मैदानातील एक मजेशीर प्रकार होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त गोलंदाजी केली 10 षटकात एक निर्धाव षटक टाकत 3 गडी बाद केले. तसेच 3 च्या इकोनॉमी रेटने 30 धावा दिल्या.
Just @ImRo45 being his hilarious self on the field 😆
Watch the action from #SLvIND LIVE now on Sony Sports Ten 1, Sony Sports Ten 3, Sony Sports Ten 4 & Sony Sports Ten 5 📺#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia #RohitSharma pic.twitter.com/5OXrxYrWCu
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2024
या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही असंच काहीसं झालं होतं. वॉशिंग्टन सुंदरने 29वं षटक टाकताना एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. पण पंचांनी त्याला बाद दिलं नाही. त्यामुळे डीआरएससाठी तो कर्णधार रोहित शर्माकडे पाहायला लागला. तेव्हा रोहित शर्माने विकेटकीपर केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरकडे पाहात म्हणाला, ‘मला काय माहिती बॉल कुठे लागला ते. मला का बघतोय.’