टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये दुसरा वन डे सामना सुरू आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 241 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांनी सर्वाधिक 40 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधक तीन विकेट घेतल्या. श्रेयस अय्यरचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे, पठ्ठ्याने बाऊंड्रीलाईवरून डायरेक्ट थ्रो करत श्रीलंकेच्या फंलंदाजाला आऊट केलं. श्रेयसने केलेला थ्रो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं कारण मिड विकेटवरून त्याने स्टम्प उडवल होते.
सामन्याच्या 49 व्या ओव्हरमधील अर्शदीपच्या पाचव्या बॉलवर कामिंदू मेंडिस याने मोठा फटका खेळला, चेंडू हवेत होता मात्र खेळाडू बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही. श्रेयस अय्यर बाऊंड्रीलाईनवरून धावत आला होती. कॅच जरी झाला नाही तरी गड्याने एकदम मजबूत थ्रो केला. मेंडिस दोन धावांसाठी पळत होता मात्र अय्यरच्या डायरेक्ट थ्रोमुळे तो आऊट झाला.
🎯 = 💯
Shreyas Iyer showcasing his brilliance on the field 👌
Watch #SLvIND 2nd ODI LIVE NOW on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/gF93azv4WW
— Sony LIV (@SonyLIV) August 4, 2024
अविष्का फर्नांडो याने 62 बॉलमध्ये 40 धावा केल्या यामध्ये त्यान पाच चौकार मारले. आज निसांकाला खातंही उघडता आलं नाही. मोहम्मद सिराज याने त्याला शून्यावर आऊट केलं. त्यासोबतच परत एकदा श्रीलंकेसाठी दुनिथ वेललागे संकटमोचक झाला. वेललागे याने 35 बॉलमध्ये 39 धावा केल्या तर त्याला कामिंदू मेंडिस याने योग्य साध देत धावसंख्या 240 पर्यंत पोहोचवली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग