Rahul Tripathi T20I Debut : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना गुरुवार (5 जानेवारी) पार पडणार आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. प्लेईंग इलेव्हनमध्ये पुणेकर खेळाडूला संधी देण्यात आली आहे. (ind vs sl 2nd odi team india may be give chance debut to punekar rahul tripathi against sri lanka at maharashtra cricket stadium pune)
बॅट्समन राहुल त्रिपाठीला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 त पदार्पणाची संधी मिळाली आहे. राहुल जन्माने रांचीचा असला तरी त्याचं पुण्यासोबत खास कनेक्शन आहे. राहुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. तसेच त्याने आयपीएलमधील डेब्यू हे पुणे जायट्संकडून 2017 साली केलं होतं. विशेष म्हणजे राहुलचं आयपीएल पदार्पण हे सुद्धा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममधूनच झालं होतं. त्यात आता राहुलचं टी 20 पदार्पणही पुण्यातील याच मैदानात झालंय. त्यामुळे त्यासाठी एमसीए स्टेडियम हे अविस्मरणीय ठरंलय.
?? Dream come true moment for @tripathirahul52 ??#TeamIndia #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/igiWnQEEIR
— BCCI (@BCCI) January 5, 2023
राहुल आतापर्यंत आयपीएलमध्ये 76 सामने खेळला आहे. या सामन्यात राहुलने 140.8 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 798 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश आहे. राहुलने आयपीएल पदार्पण हे पुण्याकडून दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध केलं होतं. त्यानंतर तो राहुलने राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं आहे.
दरम्यान संजू सॅमसनच्या जागी टीम इंडियात रणजी ट्रॉफीत विदर्भासाठी खेळणाऱ्या आणि मुळचा अमरावतीचा असलेल्या जितेश शर्माचा समावेश करण्यात आला आहे. मात्र जितेशऐवजी राहुलला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
दुसऱ्या टी 20 साठी टीम इंडिया : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.