भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी20 सामना रंगणार आहे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल उशिराने झाला. मैदान ओलं असल्याने नाणेफेकीसाठी दिरंगाई झाली. दरम्यान, सव्वा सात वाजता झालेला नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याने गोलंदाजी स्वीकारली. यावेळी संघात एक बदल केल्याचं त्याने सांगितलं. पहिल्या सामन्यात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली आहे. यासाठी उपकर्णधार शुबमन गिल याला बसवण्यात आलं आहे. संजू सॅमसनला संधी मिळाल्याने त्याचे चाहतेही खूश झाले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. हवामान पाहता दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं जाईल. तुम्हाला संघाची कामगिरी सुधारण्याची संधी असते. मग तुम्ही सामना जिंकलात तरी सुधारणा करू शकता. आजच्या सामन्यात गिल खेळणार नाही. त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. त्याच्याऐवजी संघात संजू सॅमसनला घेतलं आहे.”
कर्णधार चारिथ असलंका याने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करण्यास सक्षम आहोत. आमच्या संघात एक बदल आहे. दिलशान मधुशंका ऐवजी रमेश मेंडिस आला आहे. पहिले तीन फलंदाज खरोखरच चांगले खेळले आणि फक्त चिंतेची बाब म्हणजे गोलंदाजांची आहे. ही एक वापरलेली खेळपट्टी आहे आणि आशा आहे की नंतरच्या भागात फिरकीला मदत होईल.’ भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे भारताकडे 1-0 ने आघाडी आहे. आता दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका आपल्या खिशात घालेल. जर श्रीलंका दुसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली तर शेवटच्या सामन्याची रंगत वाढेल.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.