तिरुवअंनतपूरम : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी 15 जानेवारीला एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना दक्षिणेतील तिरुअंनतपूरममध्ये पार पडणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न रोहितसेनेचा असेल. तर विजय मिळवून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न श्रीलंकेचा असेल.
कर्णधार रोहित शर्माने या मालिकेत आतापर्यंत पहिल्या 2 सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांना संधी दिली नाही. या दोघांऐवजी संघात शुबमन गिल आणि केएल राहुलचा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यात केएलने निर्णायक क्षणी नाबाद अर्धघशतक करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तर शुबमन गिलनेही पहिल्या सामन्यात लौकीकाला साजेशी खेळी केली. मात्र या दोघांमुळे इशान आणि सूर्यकुमारला बेंचवर रहावं लागलं.
आता टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात सूर्या-इशानऐवजी नवख्या खेळाडूंना संधी मिळेल, अशी शक्यता आहे. त्यापलिकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अक्षर पटेलऐवजी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला जाऊ शकतो.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 164 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाचा यामध्ये दबदबा राहिला आहे. टीम इंडियाने 95 सामन्यांमध्ये श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला श्रीलंकेने 57 वेळा पराभव स्वीकार करावा लागलाय. शिवाय 11 सामने अनिर्णित राहिलेत. तर 1 मॅच बरोबरीत सुटलीय.
संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.
टीम श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.