Video : वनडेत पदार्पण करणाऱ्या रियान परागसाठी विराट कोहलीने व्यक्त केले असे शब्द, म्हणाला..

| Updated on: Aug 07, 2024 | 5:47 PM

टी20 नंतर रियान परागने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून पदार्पण केलं आहे. सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहीलीने रियान परागला कॅप दिली. तसेच त्याच्यासाठी महत्त्वाचे दोन शब्दही सांगितले.

Video : वनडेत पदार्पण करणाऱ्या रियान परागसाठी विराट कोहलीने व्यक्त केले असे शब्द, म्हणाला..
Image Credit source: BCCI
Follow us on

श्रीलंकेविरुद्धच्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात रियान परागने आपली छाप सोडली आहे. टी20 क्रिकेटनंतर रियान परागला वनडे सामन्यात संधी देण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यात बेंचवर बसला होता. मात्र संघाची नाजूक स्थिती आणि मैदानाची स्थिती ओळखून त्याला संधी देण्यात आली आहे. केएल राहुल आणि अर्शदीप सिंग यांना बसवून ऋषभ पंत आणि रियान परागला संधी दिली आहे. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रियान परागला संधी देण्याचा निर्णय घेतला, यात शंका नाही. रियानने पदार्पणाच्या सामन्यातच आपली चमक दाखवली. खेळपट्टीवर तग धरून असलेल्या अविष्का फर्नांडोला 96 धावांवर असताना पायचीत केलं आणि आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. त्याच्या या विकेटमुळे चांगल्या स्थितीत असलेल्या श्रीलंकेची पुरती वाट लागली. रियान परागने पहिल्याच वनडे सामन्यात 3 गडी बाद केले. 9 षटकं टाकत 54 धावा दिल्या आणि तीन गडी बाद केले.

रियान पराग भारतासाठी वनडे क्रिकेट खेळणारा 256वा खेळाडू आहे. सामना सुरु होण्यापू्र्वी विराट कोहलीने त्याला कॅप सोपवली. ही कॅप सोपवताना विराट कोहलीने दोन शब्द सांगितले. ‘रियान, सर्वात आधी तुला टीम इंडियासाठी पहिला वनडे सामना खेळण्यासाठी शुभेच्छा. आता क्रिकेटमध्ये चांगल्या प्रदर्शनासह जबाबदारीही पाहिली जाते. तुझ्यात निवडकर्त्यांना काही दिसलं असेल. तू खास आहे, म्हणूनच तुझी संघात निवड झाली आहे. तुझ्यात भारताला सामने जिंकवण्याची क्षमता आहे.’

रियान पराग आसामचा असून आसाम क्रिकेट असोसिएशनने ही त्याच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. हा क्षण कायम स्मरणात राहील. रियान परागची वनडेत पदार्पण ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. आदर्श मानणाऱ्या विराट कोहलीकडून कॅप मिळणं खरंच मोठी गोष्ट आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो.