Suryakumar Yadav : 6,6,6,6,6,6,6,6,6 सूर्याचा तडाखा, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

| Updated on: Jan 07, 2023 | 10:58 PM

टीम इंडियाने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं.

Suryakumar Yadav : 6,6,6,6,6,6,6,6,6 सूर्याचा तडाखा, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Follow us on

राजकोट : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात राजकोटमध्ये तिसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नववर्षात आपली झलक दाखवली आहे. सूर्याने या सामन्यात आपल्या लौकीकाला साजेशी अशी कामगिरी केली. सूर्याने 45 बॉलमध्ये खणखणीत शतक ठोकलं. सूर्या यासह टीम इंडियाकडून नववर्षात शतक लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. सूर्याने या सामन्यात चौफेर फटकेबादी केली. सूर्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. (ind vs sl 3rd t20i suryakumar yadav become 2nd india batter who scored most century after rohit sharma)

सूर्यकुमार बॅटिंगसाठी चौथ्या स्थानी आला. सूर्या मैदानात आला तेव्हा टीम इंडियाची 2 बाद 52 अशी स्थिती होती. त्यानंतर सूर्याने आपल्या खरा रंग दाखवला सुरुवात केली. सूर्याने स्फोटक खेळी केली. सूर्याने 45 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. तर एकूण 52 बॉलमध्ये नाबाद 112 रन्सची खेळी केली. सूर्याने या खेळीत 7 चौकार आणि 9 सिक्स ठोकले. या कामगिरीसह सूर्या टी 20 क्रिकेटमध्ये रोहितनंतर धमाका करणारा पहिलाच तर एकूण दुसरा फलंदाज ठरलाय.

टीम इंडियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहितने 4 शतक ठोकलेत. तर सूर्या 3 शतकांसह दुसरा भारतीय ठरलाय. तर सूर्यानंतर केएलने 2 शतक केलेत. विराट आणि दीपक हुड्डा या दोघांनी प्रत्येकी 1 सेंच्यूरी ठोकली आहे.

हे सुद्धा वाचा

सूर्याने पहिलंवहिलं टी 20 शतक हे 2022 मध्ये इंग्लंड विरुद्ध ठोकलं. सूर्याने तेव्हा 55 बॉलमध्ये 117 धावांची खेळी केली. तर 48 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. त्यानंर न्यूझीलंड विरुद्ध 51 बॉलमध्ये 111 रन्स केल्या होत्या. त्यावेळेस सूर्याने 49 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. तर आता श्रीलंकेविरुद्ध 45 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.

श्रीलंकेवर 91 धावांनी विजय

दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय गोलंदाजंनी श्रीलंकेला श्रीलंकेला 16.4 ओव्हरमध्ये 137 धावांवरच रोखलं. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने खिशात घातली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, अविष्का फर्नांडो, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.