कोलंबो | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया कप 2023 मधील अंतिम सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया कप ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दासुन शनाका श्रीलंका टीमचं कर्णधारपद सांभाळणार आहे.दोन्ही संघ 2010 नंतर पहिल्यांदाच आशिया कप फायनलमध्ये भिडणार आहेत. टीम इंडियाने याआधी सुपर 4 मध्ये श्रीलंकेला ऑलआऊट करत विजय मिळवलाय. मात्र श्रीलंकेची बाजूही भक्कम आहे. मात्र या दोन्ही संघांमध्ये वरचढ कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 166 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडिया या 166 सामन्यांमध्ये श्रीलंका विरुद्ध सरस राहिली आहे. टीम इंडियाने 166 पैकी 97 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 57 सामन्यांमध्ये टीम इंडियावर विजय मिळवला आहे. तर 11 सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही. तर 1 मॅच टाय राहिली आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका हे दोन्ही संघ आशिया कप फायनलमध्ये तब्बल 13 वर्षांनी पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. याआधी उभयसंघात 2010 मध्ये आशिया कप फायनल सामना झाला होता. तेव्हा टीम इंडियाने श्रीलंकेवर मात करत आशिया कप जिंकला होता. त्यामुळे आता टीम इंडिया पुन्हा अंतिम सामन्यात पुन्हा अस्मान दाखवणार की श्रीलंका विजय मिळलत पराभवाची परतफेड करणार,याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.
श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, दुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.