कोलंबो | आशिया कप 2023 फायनलमध्ये श्रीलंका क्रिकेट टीमने टॉस जिंकला. कॅप्टन दासून शनाका याने बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकाने या सामन्यासाठी अंतिम 11 मध्ये एकमेव बदल केलाय. तर टीम इंडियात तब्बल 6 बदल करण्यात आलेत. तर एका स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री देण्यात आलीय. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र या अंतिम सामन्यातही पावसाने खोडा घातलाय. त्यामुळे सामन्याला विलंब झाला आहे.
टॉस दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी झाला. त्यानंतर सर्व क्रिकेट चाहते हे 3 वाजता सामना सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होते. मात्र मैदानात पावसामुळे कव्हर होते. कव्हरवरील पाण्यामुळे ग्राउंड स्टाफला वेळ लागला. त्यामुळे सामना 3 वाजता सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे 3 वाजून 30 मिनिटांनी मैदानात जाऊन पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करुन दिली. पाहणी करण्यात आली. सामना सुरु होण्यास सर्वकाही अनुकूल होतं. त्यामुळे पुढील 10 मिनिटांनी 3 वाजून 40 मिनिटांनी सामना सुरु होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
पावसाची बॅटिंग, सामन्याला उशीर
Start of play has been delayed due to 🌧️
Stay Tuned for more updates!
Follow the match ▶️ https://t.co/xrKl5d85dN#TeamIndia | #AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/cq3ZyZnipu
— BCCI (@BCCI) September 17, 2023
दरम्यान टीम इंडिया-श्रीलंका आशिया कप फायनलमध्ये याआधी एकूण 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 4 वेळा विजय मिळवत आशिया कप जिंकलाय. तर श्रीलंकेनेही 3 वेळा टीम इंडियावर मात करत आशिया कपची ट्रॉफी उंचावलीय. त्यामुळे आता आठव्या वेळेत टीम इंडिया पुढचं पाऊल टाकणार की लंका बरोबरी साधणार, हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
आशिया कप 2023 फायनलसाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली. केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
आशिया कप फायनलसाठी श्रीलंकेचे 11 शिलेदार | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.