मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील 33 वा सामन्यात 2011 वर्ल्ड कपमधील फायनलिस्ट टीम भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध विजय मिळवून सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याच्या तयारीत आहे. तर श्रीलंकेचा विजय मिळवून सेमी फायनलच्या असलेल्या जरतरच्या आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप 2023 मधील सातवा सामना असणार आहे. हा सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर फुकटात डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवरही पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन.
वनडे वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तीक्षना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा आणि कुसल परेरा.