IND vs SL: भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं. भारताने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात 252 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 92 धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने टिच्चून मारा केला. त्यांनी आपल्या गोलंदाजीने श्रीलंकन फलंदाजांना चांगलंच सतावलं. श्रीलंकेने पहिल्या दिवसाच्या अखेरीस सहा विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज भारतीय गोलंदाजांनी केवळ 6 षटकात पाहुण्यांच्या उरलेल्या 4 फलंदाजांना बाद केलं. श्रीलंकेचा संघ 109 धावांवर गारद झाला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवी अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.
भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावात संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली.
भारताच्या जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने एकट्याने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला.
दिवसअखेर श्रीलंकेच्या फलंदाजांनी 1 बाद 28 पर्यंत मजल मारली आहे. उर्वरित तीन दिवसात श्रीलंकेलाविजयासाठी 419 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला 9 विकेट्सची गरज आहे.
दिवसअखेर श्रीलंकेच्या फलंदाजांनी 1 बाद 28 पर्यंत मजल मारली आहे. उर्वरित तीन दिवसात श्रीलंकेलाविजयासाठी 419 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला 9 विकेट्सची गरज आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला,
श्रीलंकेच्या 28 धावा झाल्या असून एक विकेट गेलीय
श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 धावांचं आव्हान
पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने भारताला यश मिळवून दिलं आहे. त्याने सलामीवीर लाहिरु तिरुमाने याला तिसऱ्याच चेंडूवर पायचित पकडलं. (श्रीलंका 0/1)
447 धावांचं लक्ष्य घेऊन श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. श्रीलंकेचे सलामीवीर लाहिरु तिरुमाने आणि दिमुथ करुणारत्ने क्रीझवर दाखल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आहे.
9 बाद 303 धावांवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डावात श्रीलंकेसमोर 447 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर 447 धावा जमवणं श्रीलंकेच्या फलंदाजांसाठी अवघड असेल.
श्रेयस बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मोहम्मद शमीने जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याने 68 व्या षटकात प्रवीण जयविक्रमाच्या गोलंदाजीवर एक षटकार आणि एका चौकारासह 16 धावा वसूल केल्या.
भारताने 9 वी विकेट गमावली आहे. लसिथ एम्बुलडेनिया याने अक्सर पटेलला (9) त्रिफळाचित करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (भारत 303/9)
श्रीलंकेच्या गोलंदाजांना मोठ यश मिळालं आहे. पहिल्या डावात 92 धावांची खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावलं होतं. शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या श्रेयसला रोखण्यात श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ एम्बुलडेनिया यशस्वी झाला आहे. त्याने श्रेयसला पायचित पकडलं. श्रेयसने 87 चेंडूत 9 चौकारांसह 67 धावा फटकावल्या
भारताने 7 वी विकेट गमावली आहे. प्रवीण जयविक्रमा याने रवीचंद्रन अश्विनला 13 धावांवर असताना निरोशन डीकवेलाकरवी झेलबाद केलं. (भारत 278/7)
61 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या विश्वा फर्नांडोवर श्रेयसने पुन्हा एकदा हल्ला चढवला. या षटकात त्याने दोन चौकारांच्या मदतीने 10 धावा वसूल केल्या. तसेच धावफलाकवर 258 धावा झळकावल्या आहेत.
भारताचा 6 वा गडी माघारी परतला आहे. विश्वा फर्नांडोने रवींद्र जडेजाला 22 धावांवर असताला त्रिफळाचित केलं. (भारत 247/6)
59 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या विश्वा फर्नांडोवर श्रेयसने हल्ला चढवला. षटकातील पहिल्याच चेंडूवर शानदार चौकार वसूल करत श्रेयस अय्यरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 69 चेंडूत 7 चौकारांसह 52 धावा केल्या.
49 षटकात धावफलकावर भारताचं द्विशतक झळकलं आहे. रवींद्र जडेजा 14 तर श्रेयस अय्यर 22 धावांवर खेळत आहेत. (भारत 207/5)
दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. भारताच्या पाचबाद 199 धावा झाल्या आहेत. भारताकडे 342 धावांची मोठी आघाडी आहे.
That’s the Dinner break on Day 2 of the 2nd Test.#TeamIndia have a huge lead of 342 runs.
Scorecard – https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm pic.twitter.com/c1p1JQ7bwy
— BCCI (@BCCI) March 13, 2022
हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर ऋषभ पंत आऊट झाला आहे. त्याने आक्रमक फलंदाजी केली. 31 चेंडूत 70 धावा करताना त्याने सात चौकार आणि दोन षटकार लगावले. भारताच्या पाच बाद 184 धावा झाल्या आहेत.
2ND Test. WICKET! 41.6: Rishabh Pant 50(31) ct & b Praveen Jayawickrama, India 184/5 https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 13, 2022
आता ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरची जोडी जमली आहे. भारताच्या चार बाद 167 धावा झाल्या आहेत. पंत आक्रमक फलंदाजी करत आहे. 22 चेंडूत 41 धावा करताना त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत.
जयाविक्रमाने भारताला चौथा धक्का दिला आहे. विराट कोहलीला त्याने 13 धावांवर पायचीत पकडलं. भारताच्या चार बाद 139 धावा झाल्या आहेत.
2ND Test. WICKET! 35.4: Virat Kohli 13(16) lbw Praveen Jayawickrama, India 139/4 https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 13, 2022
हुनमा विहारीच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. जयाविक्रमाने त्याला क्लीन बोल्ड केलं. विहारीने 35 धावा केल्या. भारताच्या तीन बाद 124 धावा झाल्या आहेत.
2ND Test. WICKET! 33.1: Hanuma Vihari 35(79) b Praveen Jayawickrama, India 116/3 https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 13, 2022
सेट होऊन चांगली फलंदाजी करणारा रोहित शर्मा 46 धावांवर आऊट झाला. रोहित आज चांगली फलंदाजी करत होता. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने आपली विकेट बहाल केली. डि सिलव्हाच्या गोलंदाजीवर त्याने मॅथ्यूजकडे झेल दिला. भारताच्या दोन बाद 100 धावा झाल्या आहेत.
2ND Test. WICKET! 30.2: Rohit Sharma 46(79) ct Angelo Mathews b Dhananjaya de Silva, India 98/2 https://t.co/loTQPfLJKd #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 13, 2022
24 षटकात भारताच्या एकबाद 81 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 38 आणि विहारी 18 धावांवर खेळतोय.
दुसऱ्या दिवसाचा पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. भारताने दुसऱ्याडावात एक विकेट गमावून 61 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालच्या रुपात भारताने आपला एकमेव विकेट गमावला. भारताकडे आता 204 धावांची आघाडी आहे. रोहित 30 आणि विहारी 8 धावांवर खेळतोय.
That will be Tea on Day 2 of the 2nd Test.#TeamIndia with a lead of 204 runs.
Scorecard – https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/qfo3zLy42g
— BCCI (@BCCI) March 13, 2022
मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर रोहित शर्माने हनुमा विहारीच्या साथीने मिळून डाव सावरला. भारताच्या एक बाद 61 धावा झाल्या आहेत. रोहित 30 आणि विहारी आठ धावांवर खेळतोय.
मयंक अग्रवालच्या रुपाने भारताचा पहिला गडी बाद झाला आहे. मयंकने 22 धावा केल्या. एमबुलडेनियाच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये डि सिलिव्हाने त्याचा सोपा झेल घेतला. भारताची स्थिती एक बाद 42 आहे.
2ND Test. WICKET! 10.4: Mayank Agarwal 22(34) ct Dhananjaya de Silva b Lasith Embuldeniya, India 42/1 https://t.co/loTQPfLJKd #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 13, 2022
खेळपट्टी गोलंदाजीस अनुकूल असल्याने भारतीय सलामीवीरांनी सावध आणि संयमी सुरुवात केली आहे. 9 षटकात भारताने धावफळकावर 35 धावा झळकावल्या आहेत. रोहित शर्मा 18 आणि मयंक अग्रवाल 17 धावांवर खेळत आहेत.
श्रीलंकेच्या संघाला पहिल्या डावात 109 धावात रोखल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल क्रिझवर दाखल झाले आहेत. तर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने चेंडू सुरंगा लकमलच्या हाती सोपवला आहे.
श्रीलंकेचा अखेरचा फलंदाज माघारी परतला आहे. रवीचंद्रन अश्विनने विश्वा फर्नांडोला 8 धावांवर असताना ऋषभ पंतकरवी यष्टीचित केलं. (श्रीलंका 109/10)
श्रीलंकेचा 9 वा गडी माघारी परतला आहे. जसप्रीत बुमराहने निरोशन डीकवेला याला 21 धावांवर असताना यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. (श्रीलंका 100/9)
भारताला 8 वं यश मिळालं आहे. रवीचंद्रन अश्विनने सुरंगा लकमल याला 5 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (श्रीलंका 100/8)
दुसऱ्यादिवसाची श्रीलंकेची खराब सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराहने लसिथ एमबुलडेनियाला बाऊन्सरवर एक रन्सवर ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. श्रीलंकेची सातबाद 95 स्थिती झाली आहे.
2ND Test. WICKET! 32.2: Lasith Embuldeniya 1(16) ct Rishabh Pant b Jasprit Bumrah, Sri Lanka 95/7 https://t.co/loTQPfLJKd #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 13, 2022
दुसऱ्या दिवसाची सुरुवात जसप्रीत बुमराहच्या षटकाने झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये डिकवेलाने दोन चौकार लगावले. श्रीलंकेची सहाबाद 94 अशी स्थिती आहे.
पहिल्या दिवशी मोहम्मद शमीने दोन विकेट काढल्या होत्या. आज सुद्धा शमी श्रीलंकन संघासाठी तितकाच धोकादायक ठरु शकतो.
ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल आहे. पण भारतीय फिरकी गोलंदाजांऐवजी वेगवान गोलंदाज यशस्वी ठरत आहेत. काल वेगवान गोलंदाजांनी पाच विकेट काढल्या.