मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरु आहे. साखळी फेरीत आतापर्यंत भारताने एकही सामना गमावलेला नाही. आता श्रीलंकेविरुद्धचा सामनाही भारत सहज जिंकेल अशीच स्थिती आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजचा कहर पाहायला मिळाला. तीन गडी झटपट बाद करत श्रीलंकेला बॅकफूटला ढकललं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 357 धावा केल्या. श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचं आव्हान ठेवलं. पण श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर बुमराहने धक्का दिला. त्यानंतर सिराजने तर श्रीलंकन फलंदाजांची पिसं काढली. मोहम्मद सिराज दरम्यान चरिथ असलंकाला जवळ जाऊन डिवचलं.
मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी खेळताना चरिथ असलंकाला त्रासदायक होतं. एक धाव घेणं देखील कठीण झालं होतं. त्यामुळे श्रीलंकेचा आणखी विकेट घेण्यासाठी मोहम्मद सिराजने सर्व काही पणाला लावल्याचं दिसलं. इतकंच काय चरिथ असलंकाने निर्धाव चेंडू सोडला की त्याच्या जवळ जाऊन डिवचत होता. जेणेकरून स्विंग बॉल खेळावा आणि बाद व्हावा. पण मोहम्मद सिराजला त्याची विकेट यश आलं नाही.
Mohammad Siraj having some serious words with Charith Asalanka 👀 !!!!!!! #INDvsSL #INDvSL pic.twitter.com/OAkO3i5Q2b
— CRICK info….. (@Prangya48501179) November 2, 2023
रोहित शर्माने दहावं षटक मोहम्मद शमीकडे सोपवलं. त्यानंतर मग काय शमीने पहिल्याच षटकात दोन गडी बाद केले. चरिथ असलंकाला बाद केलं. त्यानंतर आलेल्या दुशन हेमंथा याला शून्यावर तंबूत पाठवलं. त्यामुळे श्रीलंकेची स्थिती एकदमच वाईट झाली आहे. श्रीलंका मोठ्या फरकाने पराभूत झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका