मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत अंतिम फेरीचा संपूर्ण सामना भारताच्या पारड्यात झुकला. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. श्रीलंकेच्या सहा खेळाडूंना तंबूत पाठवलं. या सामन्यात हॅटट्रीक चुकली मात्र श्रीलंकेला बॅकफूटला पाठवण्याची मोठी कामगिरी केली. चौथ्या षटकात श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत बसला होता. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निसंकाला बाद केलं. दुसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. तिसऱ्या चेंडूवर समाराविक्रमाला शून्यावर पायचीत केलं. चौथ्या चेंडूवर असलंकाला झेलबाद केलं. पाचवा चेंडू हा हॅटट्रीक चेंडू होता. त्या चेंडूवर सिराजने विकेट घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र धनंजय डिसिल्वाने तसं होऊ दिलं नाही. उलट पाचव्या चेंडूवर मिड ऑनच्या दिशेन चेंडू तटकावला. मग काय मोहम्मद सिराज थांबतो का? जसा चेंडू मारला तशी त्याने सीमारेषेकडे धाव घेतली. ही कृती पाहून विराट कोहलीसह मैदानातील प्रेक्षकांनाही हसू आलं.
कर्णधार रोहित शर्मा याने मोहम्मद सिराज याच्या गोलंदाजीची धार पाहून मिडऑन आणि मिडविकेटवरील क्षेत्ररक्षक हटवले. त्यांना स्लिपला उभं केलं. हॅटट्रीक चेंडू मोहम्मद सिराजने ऑफ स्टम्प लाईनमधये टाकला आणि धनंजय डिसिल्वाने मिडऑनच्या दिशेन मारला. तिथे कोणीच उभं नव्हतं. मग काय सिराजने चौकार अडवण्यासाठी स्वत:च धाव घेतली. पण चौकार काही अडवू शकला नाही.
This is funny but Kuddos to him for chasing the ball 🥹🤌🏻 #Siraj
pic.twitter.com/DvRs3DcZWP— Juhi Jain (@juhijain199) September 17, 2023
मोहम्मद सिराजची ही कृती पाहून स्लिपला उभा असलेल्या विराट कोहलीला हसू आवरलं नाही. तो मैदानात जोर जोरात हसू लागला. कारण एकतर इतक्या लांबून रनअप घेऊन चेंडू टाकला आणि चेंडू मारताच सीमारेषेकडे धाव घेतली. चौकार गेला तरी सहाव्या चेंडूवर धनंजय डिसिल्वाला तंबूत पाठवलं.
W . W W 4 W! 🥵
Is there any stopping @mdsirajofficial?! 🤯The #TeamIndia bowlers are breathing 🔥
4️⃣ wickets in the over! A comeback on the cards for #SriLanka?Tune-in to #AsiaCupOnStar, LIVE NOW on Star Sports Network#INDvSL #Cricket pic.twitter.com/Lr7jWYzUnR
— Star Sports (@StarSportsIndia) September 17, 2023
मोहम्मद सिराज याने 7 षटकात 21 धावा देऊन 6 गडी बाद केले. तर एक षटक निर्धाव टाकलं. मोहम्मद सिराज याने वनडे कारकिर्दित 50 विकेट बाद करण्याचा टप्पाही गाठला आहे. भारतासमोर अवघ्या 50 धावांच आव्हान आहे. त्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित आहे. आशिया कप जिंकताच भारताच्या नावावर 8 जेतेपद होणार आहेत. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात हा दुसरा विजय असणार आहे.