भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून शिवम दुबेने पाच वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये पहिला वनडे सामना खेळला होता. त्यानंतर पाच वर्षांनी शिवम दुबे श्रीलंकेविरुद्ध वनडे सामना खेळत आहे. या सामन्यात शिबम दुबेने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी निवडली पण सुरुवात काही चांगली झाली नाही. संघाच्या 7 धावा असताना अविष्का फर्नांडो सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर पथुम निसंका आणि कुसल मेंडिस यांनी सावध पवित्रा घेतला. त्यामुळे ही फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. श्रीलंकेच्या धावांचं वेग कमी असल्याने गोलंदाजही निश्चित होते. त्यामुळे विकेट मिळवण्यासाठी 10 षटकं थांबावी लागली. कर्णधार रोहित शर्माने संघाचं 14वं आणि वैयक्तिक तिसरं षटक शिवम दुबेकडे सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवण्यात शिवम दुबेला यश आलं. पण ही विकेट आहे की नाही याबाबत शिवम दुबे संभ्रमात होता. पण केएल राहुलची अपील कामी आली.
शिवम दुबे षटकाचा पहिला चेंडू टाकत असताना समोर कुसल मेंडिस होता. शिवम दुबेने त्याला अचूक टप्प्याचा चेंडू टाकला. मेंडिस एक पाय पुढे करून फटका मारण्याच्या प्रयत्ना होता. पण प्रयत्न फसला आणि चेंडू मागच्या पॅडच्या वरच्या भागाला आदळला. त्यामुळे हा चेंडू स्टंपवरून जाईल असा भास शिवम दुबेला झाला असता. पण विकेटकीपर केएल राहुल याने जोरदार अपीलं केलं. पण शिवम दुबे तसा काही इच्छुक नव्हता. पण केएल राहुलच्या अपीलसोबत अपील करून टाकली. मग काय पंच रवींद्र विमालासिरी यांनी बाद दिला. समाचोलकांनी ही बाब हेरली आणि अपीलचं मजेशीर वर्णन केलं.
Shivam Dube Maiden ODI Wicket pic.twitter.com/PXGcsM3rL4
— Virendra Singh (@virurathore024) August 2, 2024
श्रीलंकेने यासाठी रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजमध्ये तपासणी केली. त्यात चेंडू मधल्या आणि ऑफ स्टंपवर आदळत असल्याचं दिसलं. पंचांनी मेंडीस बाद असल्याचं घोषित केलं आणि त्याला तंबूत परतावं लागलं. मेंडिस 31 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.