मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज 7 (जानेवारी) 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने 5 सदस्यीय निवड समितीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटर आणि माजी निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यावर बीसीसीआयने पुन्हा विश्वास दाखवला आहे. तर समितीतील इतर 4 नवे चेहरे आहे. बीसीसीआयने ट्वविट करत याबाबची माहिती दिली आहे. (ind vs sl t20i bcci announced selection committee chetan sharma re appoints as a chief selector shiv sundar das subrto banrjee salil ankola and shreedharan sharath)
NEWS ?- BCCI announces All-India Senior Men Selection Committee appointments.
हे सुद्धा वाचाMr Chetan Sharma recommended for the role of Chairman of the senior men’s selection committee.
More details ??https://t.co/K5EUPk454Y
— BCCI (@BCCI) January 7, 2023
सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे या सल्लागार समितीने या 5 सदस्यीय निवड समितीची निवड केली आहे. चेतन शर्मा यांची दुसऱ्यांदा निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवड समितीतील 5 जागांसाठी बीसीसीआयकडे एकूण 600 अर्ज आले होते. त्यापैकी 11 जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. नॉर्थ झोनमधून चेतन शर्मा, श्रीधरन शरत य साऊथ झोन, सलिल अंकोल वेस्ट झोन, शिव सुंदर दास इस्ट झोन आणि सुब्रतो बॅनर्जी यांची सेंट्रल झोनमधून निवड समितीत निवड करण्यात आली आहे.
एखाद्या मालिकेसाठी संघ निवडीचं काम हे निवड समिती करत असतं. कोणत्या दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, अयशस्वी ठरलेल्या खेळाडूवर पुन्हा विश्वास दाखवत संधी द्याची की डच्चू द्यायचा, असे अनेक महत्त्वाचे निर्णय हे निवड समितीला घ्यावे लागतात.
चेतन शर्मा यांच्या मार्गदर्शनात टीम इंडियाला आतापर्यंत एकही मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. चेतन शर्मा यांच्या पहिल्या कार्यकाळात टीम इंडियाला 2021 आणि 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 2022 मध्ये आशिया कपमध्येही पराभवाची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे आता निवड समितीवर मजबूत टीम निवडण्याचं आव्हान आणि तितकाट दबाव असणार आहे.