Team India : भारतीय महिला संघाचे रविवारी 2 सामने, जाणून घ्या

| Updated on: Dec 22, 2024 | 12:01 AM

Women Team India : भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी 22 डिसेंबरला 2 सामने खेळणार आहे. एका बाजूला अंतिम सामना असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

Team India : भारतीय महिला संघाचे रविवारी 2 सामने, जाणून घ्या
bcci logo
Follow us on

भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रविवार 22 डिसेंबर फार महत्त्वाचा असणार आहे. भारतीय महिला संघ रविवारी 2 सामने खेळणार आहे. एका बाजूला प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारी क्रिकेटची मेजवाणी असणार आहे. टीम इंडियाच्या या दोन्ही सामन्यांबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट म्हणजे एकच संघ दोन्ही सामने खेळणार नाहीय. अंडर 19 वूमन्स टीम इंडिया आशिया कप 2024 स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे. अंडर 19 वूमन्स आशिया कप स्पर्धेची यंदाची ही पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. तसेच टीम इंडियाने बांगलादेशचा सुपर 4 मध्ये पराभव केला आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी महाअंतिम सामना हा फार आव्हानात्मक असणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.

कोण उंचावणार पहिलावहिला अंडर 19 महिला आशिया कप?

तर दुसऱ्या बाजूला वूमन्स सिनिअर टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. उभयसंघात याआधी झालेली टी 20i मालिका टीम इंडिया इंडियाने 2-1 फरकाने जिंकली. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. हा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर लाईव्ह मॅच पाहता येईल. या सामन्याचं आयोजन हे कोंतबी स्टेडियम, बडोदा येथ करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. त्यामुळे टीम इंडियाच्या या दोन्ही महिला ब्रिगेडच्या कामगिरीकडे साऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

सिनिअर वूमन्स टीम इंडियाचा जोरदार सराव

अंडर19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसारे, मिथिला विनोद, जोशीता वीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रीथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि नंदना एस.

वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), स्मृती मानधना, उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, मिन्नू मणी, तेजल हसबनीस, प्रतिका रावल आणि हर्लीन देओल.