IND vs WI, 1st T20I, LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहता येईल भारत-वेस्ट इंडिजमधला पहिला टी-20 सामना

| Updated on: Feb 16, 2022 | 1:02 PM

स्ट इंडिजचा (West Indies Cricket Team) संघ सध्या भारत (Indian Cricket Team) दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती.

IND vs WI, 1st T20I, LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहता येईल भारत-वेस्ट इंडिजमधला पहिला टी-20 सामना
IND vs WI
Follow us on

मुंबई : वेस्ट इंडिजचा (West Indies Cricket Team) संघ सध्या भारत (Indian Cricket Team) दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघाला वनडेतला फॉर्म कायम ठेवायचा आहे. टी-20 हा एक असा फॉरमॅट आहे जिथे वेस्ट इंडिजचा संघ खूप मजबूत मानला जातो. या संघाने दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी या फॉरमॅटमध्ये विंडीज संघाला पराभूत करणे सोपे नसेल. रोहितलाही हे माहीत आहे आणि त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे.

दरम्यान, विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड आजच्या सामन्यात खेळणार आहे की नाही याकडेही भारताचे लक्ष असेल. दुखापतीमुळे पोलार्ड वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळू शकला नव्हता. जर पोलार्ड टी-20 मालिकेत खेळला तर पाहुण्या संघाला बळकटी मिळेल आणि ही बाब भारतासाठीही चिंतेची ठरू शकते कारण पोलार्ड हा असा खेळाडू आहे जो बॅट आणि बॉल दोन्हीने चमत्कार करू शकतो.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना कधी खेळवला जाईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना 16 फेब्रुवारी (बुधवार) रोजी खेळवला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना कुठे खेळवला जाईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना कधी सुरू होईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना संध्याकाळी 07.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोठे पाहू शकता?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग मी कुठे पाहू शकतो?

सबस्क्रिप्शनसह हॉटस्टार या ओटीटी अॅपवर सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

Happy Birthday Wasim Jaffer : दुसऱ्याच फर्स्ट क्लास सामन्यात त्रिशतक, 10 रणजी करंडक जिंकणाऱ्या क्रिकेटपटूचा आज वाढदिवस

IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर, विराट कोहली मोहालीत खेळणार 100वी कसोटी

हार्दिक पंड्याबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, कर्णधाराने सांगितलं T20 वर्ल्डकप टीममध्ये निवड कशी होणार?