मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना आज (शनिवारी) संध्याकाळी सात वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने ५ विकेट्सने विजय मिळवला होता. विंडिज आता दुबळा संघ झाल्यासारखा वाटत आहे. एक काळा असा होता की या संघाविरूद्ध खेळताना प्रत्येक संघाच्या खेळाडूंना जीव मुठीत धरून खेळायला लागत होतं. मात्र आताचा संघ तितका मजबूत राहिल नाही. आजचा दुसरा सामना कॅरेबियन खेळाडूंसाठी करो या मरो असा आहे. तर दुसरीकडे टीम इंडियासाठी मालिका जिंकण्याची संधी आहे. मात्र अशातच दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज सामन्याआधी हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दुसऱ्या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. सामना सुरू झाल्यावर काही तासातच बारबाडोस येथे पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात दिसून आलं की टीम इंडिया आता वर्ल्ड कपच्या तयारीला लागली आहे. रोहित शर्मा स्वत: सात नंबरल बॅटींगला खेळायला आला. आधी युवा खेळाडूंना संधी दिली मात्र ईशान किशन सोडता इतर कोणत्याही खेळाडूल छाप पाडता आली नाही.
दुसऱ्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदल दिसेल, यामध्ये संजू सॅमसनला संघात एन्ट्री मिळणार असल्याचं बोललं जात आहे. कारण संजू टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू असून त्याला संधी देऊन पारखून बघण्याचं काम टीम मॅनेजमेंट करत आहे. मात्र जर आजचा सामनाच झाला नाहीतर त्याचा फटका टीमला बसणार आहे. वर्ल्ड कप आधी काही मोजकचे सामने राहिले असून त्यामध्ये खेळाडू कशा प्रकारे प्रदर्शन करतात यावर त्यांची निवड होणार आहे.