मुंबई : वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामधील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. कॅरेबियन संघाने टीम इंडियावर ६ विकेट्सने मात करत तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ ने बरोबरी साधली आहे. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली होती आणि युवा खेळाडूंना संधी दिली होती. मात्र युवा खेळाडूंना या सामन्यामध्ये छाप पाडता आली नाही. या सामन्यामधील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीम इंडिया बॅटींग करत असताना ३७ व्या ओव्हरमध्ये ड्रिंक्स ब्रेक झाला होता. तेव्हा युजवेंद्र चहल आणि विराट कोहली मैदानावरस आले होते. त्यावेळी मैदानात कुलदीय यादव आणि शार्दूल ठाकूर खेळत होते. आपल्या संंघातील युवा खेळाडूंसाठी विराटने पाणी नेत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
1 hi to ❤️ hai, kitne baar jeetoge? King Kohli turns water boy!
.
.#INDvWIAdFreeonFanCode #INDvWI pic.twitter.com/CYE2uvNAC2— FanCode (@FanCode) July 29, 2023
विराट कोहली हे नाव सर्वांनाच माहित आहे. कोहलीने आतापर्यंत क्रिकेटमधील अनेक विक्रमांणा गवसणी घातली आहे. कोहलीने आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. कोहली सहकारी खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन फक्त नवीन असताना सुरूवातीलाच गेला होता. त्यानंतर तो कर्णधारच झाला होता आणि कोहली खेट मैदानातचच दिसला. मात्र कोहलीने मैदानावरील कृतीने सर्वांच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या होत्या.
टीम इंडियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ३७ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करत टीम इंडियावर विजय साकारला. . टीम इंडियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ३७ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करत टीम इंडियावर विजय मिळवत पूर्ण केलं.