मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्येही निसटता पराभव झालाय. सामना शेवटच्या क्षणी वेस्ट इंडिजच्या पारड्यात झुकला. कर्णधार हार्दिक पंड्याने कमाल करून दाखवली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला अवघ्या 152 धावा करता आल्या. यामध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या तिलक वर्मा याने केलेल्या अर्धशतकी खेळी करत डाव सावरला होता. मात्र अकील हौसेन याने मुकेश कुमार याला फोडून काढत संघाला विजय मिळवून दिला.
Captain Hardik Pandya strikes twice in the first over ?
How spectacular was that catch from SKY ??#HardikPandya #WIvIND #CricketTwitter pic.twitter.com/caP4IoskP9
— OneCricket (@OneCricketApp) August 6, 2023
हार्दिक पंड्या याने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेत दमदार सुरूवात केली होती. मात्र अखेरच्या क्षणी टीम इंडियाचा निसटता पराभव झाला. हार्दिक पंड्या याने पहिल्याच बॉलवर ब्रेंडन किंग याला आऊट केलं. चौकार मारण्याच्या प्रयत्नात किंग कॅच आऊट झाला. सूर्यकुमारने एक कमाल कॅच घेत या विकेटमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. त्यानंतर जॉनसन चार्ल्स हासुद्धा गॅपमध्ये चौकार मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. तिलक वर्माने त्याचा झेल घेतला.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.