IND vs WI 3rd ODI 2023 : रोहित शर्माकडून कानाडोळा पण हार्दिककडून या खेळाडूचं 10 वर्षांनी कमबॅक

| Updated on: Aug 02, 2023 | 5:07 PM

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिल्यामुळे संघाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. या सामन्यामध्ये पंड्याने बेंचवरील एका खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये 10 वर्षांनी संधी दिली. 

IND vs WI 3rd ODI 2023 : रोहित शर्माकडून कानाडोळा पण हार्दिककडून या खेळाडूचं 10 वर्षांनी कमबॅक
Follow us on

मुंबई : टीम इंडियाने अखेरच्या वन डे सामन्यामध्ये विजय मिळवत 2-1 ने मालिका जिंकली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने कसोटी आणि वन डे मालिका जिंकली आहे. आता 3 ऑगस्टपासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाची सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरूद्ध सलग 13 मालिका जिंकल्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिल्यामुळे संघाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. या सामन्यामध्ये पंड्याने बेंचवरील एका खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये 10 वर्षांनी संधी दिली.

टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर संघात अनेक प्रयोग करून पाहिले. बॅटींग लाईनअपमध्ये बदल करण्यात आला आणि युवा खेळाडूंना चाचपण्यात आलं. मात्र टी-20 स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव फेल ठरला. ईशान किशनने छाप पाडली. छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या ईशानने सलग तीन सामन्यांमध्ये अर्धशतक करत माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

गेल्या 10 वर्षांनंतर या खेळाडूने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक केलेला खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जयदेव उनाडकट आहे.  तब्बल 10 वर्षांनंतर या खेळाडूने वन डे सामन्यामध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व केलं. जयदेवने 2013 साली भारतीय संघासाठी शेवटचा एकदिवसीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध कोची येथे खेळला होता.

पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जयदेवला काही प्लेइंग 11 स्थान मिळालं नाही. त्यामुळे स्क्वॉडमध्ये जागा मिळवूनही त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळतं की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र रोहित शर्मानंतर कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं होतं. हार्दिकने शेवटच्या सामन्यामध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्या  जागी त्याला संघात घेतलं होतं. एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून काम पाहणाऱ्या हार्दिक पांड्याने जयदेव उनाडकट वर विश्वास दाखवत संघात स्थान दिलं. जयदेव उनाडकट याने 5 ओव्हरमध्ये त्याने 16 धावा देत 1 विकेट घेतली.