मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या बुधवारी संध्याकाळी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून जो संघ जिंकेल तो मालिका जिंकणार आहे. टीम इंडियाचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पराभव झाला होता. टीम मॅनेजमेंटल प्रयोग करणं महागात पडलं होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देत बसण्यात आलं होतं. मात्र संघाला याचा मोठा फटका बसला होता. युवा खेळाडू अपयशी ठरल्याने टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला होता.
तिसऱ्या आणि अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे संघात परतणार असल्याचं मुख्य कोच राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र संघामधील काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. कारण टीम इंडियाला हा सामना गमावणं परवडणार नाही. मालिका हातातून जाऊ शकते त्यासाठी टीम इंडियाची टीम मॅनेजमेंट खाली दिलेल्या खेळाडूंना संघातून डच्चू देण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन याला संधी देऊनही त्याला सोनं करता आलं नाही. त्यानंतर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये अपयशी ठरत असलेल्या सूर्यकुमार यादवलाही दोन सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या दोन खेळाडूंना बाहेर काढण्याची जास्त शक्यता आहे. यासोबतच मागील सामन्यामधील पदार्पणवीर मुकेश कुमार याच्या जागी जयदेव उनाडकट यासा संधी दिली जावू शकते. दोन्ही संघ आपली सर्व ताकद पणाला लावतील आणि सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.
दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये पात्र न झालेल्या विंडिज संघाकडून झालेल्या पराभवामुळे क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. वर्ल्ड कपला काही दिवस बाकी असताना अशा प्रकारे पराभव होणं भारतासाठी चिंतेची बाब आहे.