मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंंडिजमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील तिसरा सामना आज पार पडणार आहे. आजचा सामना म्हणजे पूर्ण मालिकेचा निकाल आहे, कारण वेस्ट इंडिज संघाकडे 2-0 ची आघाडी असून आजच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला तर त्यांच्याकडे विजयी आघाडी असणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे. इतकंच नाहीतर आजच्या सामन्यानंतर जवळपास 17 वर्षांचा इतिहास बदलला जाणार आहे.
टीम इंडियाचा आजच्या सामन्यामध्ये पराभव झाला तर गेल्या 17 वर्षांनंतर कॅरेबियन संघाकडून टीम इंडियाचा तीन सामन्यात पराभव होणार आहे. 2006 साली वेस्ट इंडिज संघाकडून टीम इंडियाचा पराभव झाला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघाने भारतामध्ये येत विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने कोणताही मालिका गमावली नाही.
जर आजच्या सामन्यात पराभव झाला तर हा 17 वर्षांता रेकॉर्ड मोडला जाणार आहे. त्यासाठी हार्दिक पंड्या आणि कंपनीला सांघिक कामगिरी करावी लागणार आहे. सलग दोन टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये हातातोंडाशी आलेल घास विंडिजच्या तळाच्या फलंदाजांनी ओढून घेतला होता.
दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकतो. हार्दिक पंड्या सलामीवीर शुबमन गिल याच्या जागी संघात यशस्वी जयस्वाल याला संधी देऊ शकतो. मागील दोन्ही सामन्यामध्ये गिल अपयशी ठरत असलेला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ऑल राऊंडर खेळाडू अक्षर पटेल याच्या जागी वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याचीही शक्यता आहे. कारण अक्षरला गेल्या सामन्यात एकही ओव्हर पंड्याने दिली नव्हती.