मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिमधील सामन्यामध्ये विजय मिळवत इंडियाने मालिका 2-1 अशी करत आपली प्रतिष्ठा वाचवली. स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने या सामन्यात मॅचविनिंग खेळी केली. तिसऱ्या सामन्यात चाहत्यांना त्यांचा खरा सूर्या दिसला. भावाने अवघ्या 44 चेंडूत 83 धावा करत संघाला संघाली विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवलं होतं. सूर्याच्या वन डे मालिकेतील आणि टी-20 पहिल्या दोन सामन्यांमधील खराब कामगिरीमुळे त्याचं संघातील स्थानही धोक्यात आलं होतं. मात्र आपला दांडपट्टा काढत त्याने विंंडिज गोलंदाजांची पिसे काढलीत. मॅच संपल्यावर बोलताना सूर्याने प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य केली.
सूर्यकुमार यादवला मॅच संपल्यावर त्याच्या वन डेमधील कामगिरीबाबत विचारण्यात आलं. यावर, माझे वनडे मधील नंबर खूप खराब आहेत आणि ते मान्य करायला मला लाज वाटत नाही. प्रामाणिकपणे सर्वात महत्त्वाचा आहे. कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित यांनी मला अजून सराव करत परिस्थितीनुसार खेळायला सांगितलं आहे. संघ मला संधी देत आहे त्याचा फायदा करून घेणं हे माझ्यावर अवलंबून असल्याचं सूर्यकुमार यादव याने म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादव याची वन डेमधील कामिगिरी खराब आहे. त्यामुळे त्याला वन डे मध्ये संघात जागा दिल्यावर निवड समितीवर टीका केली जाते. मात्र सूर्या काय आहे हे सर्वांनाच माहित आहे त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याला संधी देत परिपक्व करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सूर्याने एकदा वन डे मध्ये लय पकडली तर वर्ल्ड कपमधील मिडल ऑर्डरची समस्या मुळापासून उखडेल. मात्र त्यासाठी सूर्याने आपल्या कामगिरीने तशी जागा मिळवायला हवी.
दरम्यान, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची सुरूवात वाईट झाली होती. पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल याला मोठी खेळी करता आली नाही. त्यासोबतच शुबमन गिलसुद्धा परत एकदा फेल गेला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादव याने 44 चेंडूत 83 धावा तर तिलक वर्मा याने नाबाद 49 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.