Tilak Varma : टीम इंडियाला मिळाला दुसरा ‘सूर्यकुमार’, तिलक वर्माकडून सूर्याचा खास रेकॉर्ड नावावर

| Updated on: Aug 09, 2023 | 9:59 AM

Tialk varma Record : गेल्या 17 वर्षांपासूनचा अपराजित राहिलेल्या टीम इंडियाचा रेकॉर्ड मोडला असता. मात्र यंग ब्रिगेडने तसं काही होऊ दिलं नाही, स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा दोघांनी संघाला विजय मिळवून दिला.

Tilak Varma : टीम इंडियाला मिळाला दुसरा सूर्यकुमार, तिलक वर्माकडून सूर्याचा खास रेकॉर्ड नावावर
Follow us on

मुंबई : टीम इंडियासाठी वेस्ट इंडिज विरूद्धचा तिसरा टी-20 सामना प्रतिष्ठेचा होता. सलग दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना गमावणं टीम इंडियाला परवडणार नव्हतं. गेल्या 17 वर्षांपासूनचा अपराजित राहिलेल्या टीम इंडियाचा रेकॉर्ड मोडला असता. मात्र यंग ब्रिगेडने तसं काही होऊ दिलं नाही, स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा दोघांनी संघाला विजय मिळवून दिला. यामध्ये  युवा तिलक वर्मा सर्वाचं लक्ष वेधलं असून तिन्ही सामन्यांमध्ये त्याने 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या कामगिरीसह तिलक वर्मा याने सूर्यकुमार यादवच्या विक्रमासोबत बरोबरी साधली आहे.

कोणता आहे तो खास विक्रम ?

तिलक वर्मा याने पहिल्या सामन्यात 39, दुसऱ्या 51 आणि तिसऱ्या सामन्यात 49 धावा केल्या. पदार्पण केल्यावर तिन्ही सामन्यांमध्ये 30 पेक्षा जास्त धावा करणारा तिलक दुसरा खेळाडू ठरला आहे. इतकंच नाहीतर पहिल्या तीन सामन्यांमध्ये मिळून तिलक वर्मा याने 139 धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमारनेही आपल्य पहिल्या तीन सामन्यात 139 धावा केल्या होत्या.

पदार्पण केल्यावर पहिल्या तीन सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा दीपक हुडा याने सर्वाधिक 172 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानी सूर्या आणि तिलक असून त्यांनी 139 धावा केल्यात. तर या यादीमध्य तिसऱ्या स्थानी गौतम गंभीर असून त्याने 109 धावा केल्या होत्या.

सामन्याचा धावता आढावा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडिज संघाने 159-5 धावा केल्या. यामध्ये , ब्रँडन किंग 42 धावा आणि रोव्हमन पॉवेल 40 धावा केल्या. तर कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याची 83 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी आणि तिलक वर्मा याच्या नाबाद 49 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.